Sunday, March 30, 2025
HomeजळगावPhoto Gallery : डॉ. श्रीराम लागू यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Photo Gallery : डॉ. श्रीराम लागू यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पुणे –  डॉ. श्रीराम लागू यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. लागू निरीश्वरवादी असल्यामुळे अंत्यसंस्कारावेळी कोणत्याही धार्मिक विधी करण्यात आल्या नाहीत.

डॉ. लागू यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले होते. त्यांचा मुलगा आनंद हा अमेरिकेहून येणार असल्याने त्यांचे पार्थिव दीनानाथ रुग्णालयात ठेवण्यात आले होते.

- Advertisement -

आज सकाळी १० ते ११  या वेळेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी बालगंधर्व रंगमंदिर येथे ठेवण्यात आले होते.यावेळी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, अभिनेत्री शुभांगी गोखले, अभिनेते राजन भिसे, अमोल पालेकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, खासदार गिरीश बापट, आमदार मुक्ता टिळक यांच्यासह अनेकांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.

त्यानंतर लागू यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी अभिनेत्री दीपा श्रीराम, मुलगा आनंद लागू, मुलगी डॉ. शुभांगी कानिटकर, जावई डॉ. श्रीधर कानिटकर आणि लागू कुटुंबीय असा परिवार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : आई-वडिलांच्या मृत्यूनंतर पाचव्या दिवशीच समृद्धीने घेतला अखेरचा श्वास

0
ओझे | वार्ताहर | Oze दिंडोरी-वणी रस्त्यावरील (Dindori-Vani Road) वलखेड फाट्यावर आयशर व कार यांच्यात झालेल्या अपघातामध्ये आई-वडिलांच्या (Parents) निधनानंतर गंभीर जखमी झालेली मुलगी समृद्धीचेही...