Friday, November 22, 2024
Homeनगरकार्यकर्त्यांच्या भावना आणि आग्रहामुळे निवडणूक आयोगाकडे अर्ज

कार्यकर्त्यांच्या भावना आणि आग्रहामुळे निवडणूक आयोगाकडे अर्ज

40 बुथवरील ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅटची मोजणीची मागणी

राहाता/अहमदनगर |प्रतिनिधी|Rahata|Ahmednagar

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या भावना आणि आग्रहामुळे वेगवेगळ्या विधानसभा मतदार संघातील 40 बुथवरील ईव्हीएम मशिन आणि व्हीव्हीपॅटची मोजणी करण्याची मागणी आपण निवडणूक आयोगाकडे केली असल्याचे डॉ. सुजय विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने आणि निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांना अधिन राहुन दिलेल्या विहीत मुदतीत आपण आयोगाकडे या मागणीचा अर्ज दाखल केला असून यासाठी आयोगाकडे नियमाप्रमाणे 18 लाख 88 हजार रुपयांची फी जमा केली असल्याचेही ते म्हणाले.

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीत मला दुसर्‍या क्रमांकाची मते मिळालेली आहेत. सदरील निकाल आम्ही स्विकारलेला आहेच. परंतू मतदार संघातील माझे कार्यकर्ते आणि हितचिंतक यांची असलेली भावना आणि आग्रह लक्षात घेवून एकुण 40 बुथ वरील व्हीव्हीपॅट पुन्हा मोजण्याची मागणी आपण केली आहे. या अर्जाबाबत आयोग निर्णय घेईल, असेही डॉ.विखे पाटील यावेळी म्हणाले. नगर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅटच्या पडताळणी शुल्कापोटी प्रत्येकी प्रत्येकी 47 हजार 200 प्रमाणे 18 लाख 88 हजार रुपयांचे शुल्कही विखे यांच्याकडून जिल्हा कोषागार कार्यालयात जमा करण्यात आलेले आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियमानुसार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जारी केलेल्या आदेशात निवडणुकीत पराभूत अथवा क्रमांक 2 व क्रमांक 3 ची मते मिळालेल्या उमेदवारांना एकूण 5 टक्के मतदान यंत्र व व्हीव्हीपॅट पडताळण्याची मागणी करत येते. यासाठी मतमोजणी झाल्यानंतर 7 दिवसात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. त्यानुसार डॉ. विखे यांनी या सवलतीचा लाभ घेत पडताळणीसाठी अर्ज केला आहे. अहमदनगर मतदारसंघात 2026 मतदान केंद्र होती. त्यापैकी नगर शहर 5, शेवगाव-पाथर्डीतील 5, राहुरीतील 5, कर्जत-जामखेडमधील 5, पारनेरमधील 10 व शीगोंद्यातील 10 अशा एकुण 40 मतदान यंत्रे व व्हीव्हीपॅट पडताळणीसाठी अर्ज केलेला आहे.

पराभव पचवता आला पाहिजे
नगर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक अतिशय पारदर्शक झालेली आहे. विरोधकांचे आरोप चुकीचे आहेत. मतमोजणीच्या वेळी व्हीव्हीपॅटसह मतदान यंत्रातील मतांची मोजणी झालेली आहे. विजय आणि पराजय पचवता येणार्यांनी निवडणुकीत उतरावे. विजयाचा आनंदासोबतच पराभव पचवता आला पाहिजे.
– खा. नीलेश लंके, शरद पवार गट

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या