Sunday, September 29, 2024
Homeनगरसंगमनेर किंवा राहुरी, डॉ. सुजय विखे पाटलांसमोर विधानसभेसाठी पर्याय?

संगमनेर किंवा राहुरी, डॉ. सुजय विखे पाटलांसमोर विधानसभेसाठी पर्याय?

आमदारकी लढवण्याचे सूतोवाच || थोरात-तनपुरेंसमोर आव्हान

लोणी | Loni

नगर लोकसभा मतदारसंघात (Nagar Loksabha Constituency) पराभव झाल्याने आता माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Dr. Sujay Vikhe Patil) यांनी विधानसभेची चाचपणी सुरू केली आहे, पण ती करताना त्यांनी राजकीय बॉम्बच टाकला आहे. संगमनेर (Sangamner) किंवा राहुरी (Rahuri) असे दोन मतदार संघांचे पर्याय आपल्यासमोर असल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याने काँग्रेसचे संगमनेरचे ज्येष्ठ नेते आ. बाळासाहेब थोरात व राहुरीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते आ. प्राजक्त तनपुरे (MLA Prajakt Tanpure) यांच्यासमोर आव्हान उभे राहणार आहे. दरम्यान, नेवासे (Newasa) तालुक्यातील कार्यक्रमात त्यांनी, विठ्ठलराव लंघे व बाळासाहेब मुरकुटे यांच्यात समन्वय होणार नसेल तर मी मोकळाच आहे, असे सूचक भाष्य केल्याने शिवसेना आमदार शंकरराव गडाखांच्या गोटातही अस्वस्थता पसरली आहे.

- Advertisement -

डॉ.सुजय विखे पाटील यांनी गुरुवारी माध्यमांशी संवाद साधताना शिर्डी विधानसभा मतदारसंघात (Shirdi Assembly Constituency) सुरू असलेल्या दौर्‍यांबाबत काही गोष्टी स्पष्ट केल्या. या मतदार संघातून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Guardian Minister Radhakrishna Vikhe Patil) हेच निवडणूक लढविणार असून, आमच्या कुटुंबाच्या दृष्टीने सुध्दा सर्वपरी तेच आहेत. त्यामुळे मी शिर्डीमधून निवडणूक लढवेल ही चर्चा निष्फळ आहे, असे स्पष्ट करून ते म्हणाले, श्रीरामपूर (Shrirampur) राखीव असल्याने संगमनेर आणि राहुरी हाच माझ्यासमोर पर्याय असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. विधानसभा निवडणूक लढविण्याच्या प्रश्नावर बोलताना डॉ.सुजय विखे पाटील म्हणाले की, उत्तर भागामध्ये श्रीरामपूर मतदार संघ हा राखीव आहे.

कोपरगावचे (Kopargav) राजकाराण खूप क्लिष्ट आहे. त्यामुळे राहुरी आणि संगमनेर हेच पर्याय माझ्यासमोर आहेत. कारण, याही तालुक्यात अनेकजण इच्छुक आहेत. त्यांच्यात एकमत झाले नाही आणि माझ्या नावावर एकमत होत असेल तर आपण तयार आहोत. माझे काम फक्त अर्ज करण्याचे आहे. पक्षाने आदेश दिला तर, त्यानुसार आपण पुढे निर्णय करणार असल्याचे सूचक भाष्य यांनी केले. लोकतांत्रिक प्रक्रियेत सर्वांनाच उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे व भारतीय जनता पक्षाचे वैशिष्ट हेच आहे. पक्षाकडे सामान्य कार्यकर्ता उमेदवारी मागू शकतो. नगर दक्षिणमध्ये आ.राम शिंदे (MLA Ram Shinde) यांच्यासह अनेकजण इच्छुक होते. त्याच पध्दतीने विधानसभेला कोणी उमेदवारीबाबत इच्छा व्यक्त केली असेल तर यात गैर काही नाही अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.

नेवाशातील भाष्यही चर्चेत

माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे (Balasaheb Murkute) आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे दोन्हीही नेते विधानसभेसाठी इच्छूक आहेत. त्यामुळे पक्षाचा निर्णय दोघांनीही मान्य केला पाहिजे. तुमच्या दोघात जर समन्वय झाला नाही तर मी आता मोकळाच आहे, असे.डॉ. विखेंनी नुकतेच नेेवाशात (Newasa) केले. त्यांच्या या भाष्यानंतर मुरकुटे आणि लंघे यांनी डॉ. विखे यांच्यासमोर येऊन तुमच्या प्रस्तावाला तयारी आहे, तुमची उमेदवारी आत्ताच जाहीर करुन टाका, असे दोघांनीही स्पष्ट करताच डॉ. विखे यांनी नावातच दम लागतो अशी मिश्कील टिप्पणी केली. राजकारणाच्या बदलत्या काळात जपून निर्णय घ्यावे लागतात. कोणता मतदार कोणाचे काय गुण पाहून कोणाला मतदान टाकेल, याचा नेम नसतो. त्यामुळे आता सावध भूमिका घेण्याची राजकारणात गरज निर्माण झाल्याचे त्यांचे भाष्यही चर्चेत आहे.

जेथे कमी तेथे मी
मला आता वेळ आहे, शेजारी कुठे संधी मिळाली तर विधानसभा लढविण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. ज्या तालुक्यात उमेदवारीबाबत समन्वय होणार नसेल, अशा मतदार संघात माझ्या नावावर एकमत झाल्यास मी निश्चित तेथून निवडणूक लढविण्यास तयार आहे, असे भाष्य करून डॉ. विखेंनी पारनेर (Parner), कर्जत-जामखेड (Karjat Jamkhed), नेवासा असे अन्य तीन पर्यायही खुले ठेवल्याने तो चर्चेचा विषय झाला आहे.
- Advertisment -

ताज्या बातम्या