Saturday, July 27, 2024
Homeनाशिकमनपा निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

मनपा निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिका निवडणुकीसाठी( NMC Elections ) निवडणूक आयोगाच्या ( Election Commission ) सूचनेनुसार नाशिक महापालिका प्रशासनाने मतदार याद्या ( Voter lists )प्रसिद्ध केल्या आहेत. ऑनलाईन प्रसिद्ध होण्यासाठी तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे ऑफलाइन याद्या प्रसिद्ध करून शहरातील सर्व सहा विभागांमध्ये त्या ठेवण्यात आल्या आहेत. 1 जुलैपर्यंत त्याच्यावर हरकती दाखल होणार असून 9 जुलैला अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. मागच्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा सुमारे दोन लाख मतदारांची भर पडली आहे. 12 लाख मतदारांची यादी जाहीर करण्यात आली.

- Advertisement -

मतदार याद्या ऑनलाइन देखील प्रसिद्ध करण्याच्या होत्या मात्र राज्यातील आठ महापालिकांच्या लोड आयोगाच्या वेबसाईटवर असल्यामुळे लाखो नावे त्याच्यावर अपलोड होऊ शकली नाही. महापालिका प्रशासनाचे प्रयत्न सायंकाळपर्यंत सुरू होते. विभागनिहाय याद्या तयार करून त्या शहरातील सर्व सहा विभागांमध्ये सकाळी 11 वाजता प्रसिद्ध करण्यात आले. यामध्ये नाशिक पूर्व विभाग, नाशिक पश्चिम विभाग, पंचवटी विभाग, सातपूर विभाग, नवीन नाशिक विभाग तसेच नाशिकरोड विभाग यांच्या कार्यालयांमध्ये याद्या ठेवण्यात आल्या आहेत.

नाशिक महापालिकेच्या प्रभाग रचनेला अंतिम मान्यता

मिळाल्यानंतर 31 मे रोजी महिलांसाठी आरक्षणासाठी सोडत काढण्यात आली. महिला आरक्षण सोडत काढल्यानंतर त्यावर हरकती मागविल्या होत्या. त्यानुसार, नाशिक महापालिका आरक्षण सोडतीवर 2 जून दोन आणि 6 जूनला 2 याप्रमाणे चार हरकती आल्या होत्या. संबधित आरक्षणाच्या हरकतीवर सुनावणी होउन त्या फेटाळण्यात आल्यानंतर अंतिम महिला आरक्षण रचना राजपत्रात प्रसिध्द झाल्यानंतर पुढचा टप्पा म्हणजे आज गुरुवारी (ता.23) प्रारुप मतदार याद्या प्रसिध्द झाल्या. सकाळी अकराला याद्या प्रसिध्द झाल्यानंतर ऑफलाईन स्वरुपात यादी महापालिका निवडणूक विभागाने काढली. त्यानंतर शहरातील महापालिकेच्या सहाही विभागीय कार्यालयात प्रारुप याद्या प्रसिध्द करण्यात आल्या.

विभागनिहाय प्रभाग क्रमांक

पंचवटी प्रभाग : 1 ते 8, नाशिक पश्चिम 9, 16 आणि प्रभाग 18, सातपूर प्रभाग 10 ते 15, नाशिक पूर्व : 17, 19 ते 21, 27 ते 29,39, 40 नाशिक रोड : 22 ते 26 आणि 41 ते 43, नवीन नाशिक विभाग : 30 ते 38 आणि प्रभाग 44 याप्रमाणे प्रभागांच्या प्रारुप मतदार याद्या तेथील विभागीय कार्यालयात प्रसिध्द करण्यात आल्या. प्रारुप मतदार याद्यावर उद्यापासून हरकती नोंदविता येणार आहे. येत्या एक जुलैपर्यत मतदार याद्यावर हरकती नोंदविता येणार आहे. हरकतीवर सुनावणी झाल्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिध्द होईल. दरम्यान आजच्या यादीनुसार साधारण 12 लाख मतदार आहेत. गेल्या पंचवार्षीक निवडणुकीच्या तुलनेत साधारण दोन लाख मतदार वाढले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या