Wednesday, January 7, 2026
Homeक्राईमShrirampur : नशेची औषधं बाळगणारी गोंधवणीची तरूणी पोलिसांच्या जाळ्यात

Shrirampur : नशेची औषधं बाळगणारी गोंधवणीची तरूणी पोलिसांच्या जाळ्यात

मेफेटरमीन इंजेक्शनच्या 50 बाटल्या जप्त || तिच्या मित्रावरही गुन्हा दाखल

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शहर पोलिसांनी शनिवारी दुपारी नॉदर्न ब्रँच परिसरात आरोग्यास हानिकारक असलेल्या औषधांची अवैध विक्री करणार्‍या एका तरूणीला ताब्यात घेतले असून तिच्याकडून 16 हजार 740 रुपयांच्या मेफेटरमीन इंजेक्शनच्या 50 बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

या प्रकरणी सदर तरूणीसह तिच्या मित्रावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल दुपारी 12.50 वाजता पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांना नॉदर्न ब्रँच येथे लाल टी-शर्ट व पिवळा स्कार्फ घातलेली एक तरूणी निळ्या रंगाच्या जुपिटर स्कूटीवरून गुंगीकारक औषधांची विक्री करणार असल्याचे माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचांच्या उपस्थितीत कारवाईचे नियोजन करण्यात आले. पोलिसांनी पंच व औषध निरीक्षक श्री.मुळे यांना सोबत घेऊन सापळा रचला. दुपारी साधारण 1.50 वाजेच्या सुमारास निळ्या रंगाच्या जुपिटरवर सदर महिला आल्यानंतर तिला थांबवण्यात आले. झडती दरम्यान तिच्या स्कुटीच्या डिकीतून 50 सीलबंद बाटल्या व मेफेटरमीन इंजेक्शन मिळून आले.

YouTube video player

औषध निरीक्षकांनी तपासणी केली असता ही औषधे ‘एच’ प्रकारातील असल्याचे स्पष्ट झाले. याचा अर्थ ही औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विक्री करता येत नाहीत व त्याचा चुकीचा वापर केल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आपले नाव शिल्पा शेळके (रा. गोंधवणी, श्रीरामपूर) असल्याचे सांगितले. तसेच तिच्याकडे कोणताही औषध विक्री परवाना नसल्याचे आढळले. तसेच, ती औषधे परवानगीशिवाय ऑनलाईन खरेदी करून विना बिलाने बाजारभावापेक्षा दुप्पट दराने विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले.

एका बाटलीची किंमत 334 रुपये असताना ती 700 रुपयांना विकली जात असल्याची माहिती सदर तरूणीने दिली. तसेच ही औषधे ती मित्र गणेश मुंडे (रा. स्वप्ननगरी, गोंधवणी) याच्या मदतीने स्थानिक जीममध्ये व्यायाम करणार्‍या तरुणांना व इतर ग्राहकांना विकत असल्याचे स्पष्ट केले. मेफेटरमीन इंजेक्शनचा वैद्यकीय उपयोग रक्तदाब कमी झाल्यास केला जातो. मात्र, या औषधांचा गैरवापर शरीराची क्षमता वाढविण्यासाठी केला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. औषध निरीक्षक श्री.मुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या इंजेक्शनचा चुकीचा वापर केल्यास झोप येणे, भास, आकडी असे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. यामुळे ग्राहकांच्या आरोग्याला व जिवितास गंभीर धोका निर्माण होतो.

या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या औषधांपैकी काही नमुने तपासणीसाठी शासकीय प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. या कारवाईमुळे श्रीरामपूरात अवैध औषध विक्रीच्या टोळ्यांचे धाडस वाढत असल्याचे स्पष्ट झाले असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे हे करीत आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : “फक्त एक मत मला द्या, उरलेली...

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik आगामी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) पार्श्वभूमीवर नवीन नाशकात (Nashik) प्रचाराला वेग आला असतानाच, काही इच्छुक उमेदवारांनी (Candidate) निवडलेली...