धुळे Dhule। प्रतिनिधी
धुळे जिल्ह्यातील महिला (women) सर्वांत जास्त मद्यपी (more drunk) असल्याचा राष्ट्रीय कौंटूंबिक आरोग्य यंत्रणेच्या (National Family Health System) अहवालावर (report)राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP Congress) संताप व्यक्त (expressed anger) केला असून याबाबत धिक्कार करीत आज प्रशासनाला (administration) निवेदन (statement) दिले. खुलासा करा अन्यथा माहिती देणार्या अधिकार्यांच्या तोंडाला काळे फासू असा इशाराही आंदोलकांनी दिला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी रणजीत राजे भोसले, यशवंत डोमाळे, महेंद्र शिरसाठ, राजेंद्र चौधरी, रईस काझी, मनोज कोळेकर, भटू पाटील, उमेश महाजन, नजीर शेख, फिरोज पठाण, गोरख कोळी, रामेश्वर साबरे, कुणाल पवार, जगन ताकटे, अंबादास मराठे, मयुर देवरे, भूषण पाटील, दानिश पिंजारी, संजय सरग, गोलू नागमल, निलेश चौधरी, रमनलाल भावसार, सरोज कदम, तरुणा पाटील, निर्मला शिंदे, वंदना केदार, स्वामिनी पारखे, निखिल मोमाया, निलेश चौधरी आदी उपस्थित होते.
धुळे जिल्ह्यातील महिला या राज्यात सर्वांत जास्त दारु पितात. व त्या मद्यपी आहेत. असा अहवाल राष्ट्रीय कौंटूबिक आरोग्य यंत्रणेने कशाच्या आधारावर दिला? या अहवालामुळे धुळे जिल्ह्यातील सर्वच महिलांचा अपमान झाला असून राज्यामध्ये धुळ्यातील महिला या चेष्ठेचा विषय झाला आहे. हा अहवाल म्हणजे धुळे जिल्ह्याचा अपमान आहे. सदर अहवाल कोणत्या माहितीच्या आधारे तयार केला याचा खुलासा झाला पाहिजे.
धुळे जिल्ह्याची आकडेवारी कुठून आणली, कोणी दिली, कोणते निकष लावून सर्व्हेे केला, ही माहिती जनतेसमारे येणे गरजेचे आहे.
राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारने जिल्ह्यातील महिलांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचले आहे. सदर अहवाल त्वरीत मागे घ्यावा. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात येवून आज निवेदन देण्यात आले.