Wednesday, May 22, 2024
Homeनाशिकतीनशे कोटींच्या थकबाकीमुळे जानेवारीत पुन्हा वाजणार वसुलीचा ढोल

तीनशे कोटींच्या थकबाकीमुळे जानेवारीत पुन्हा वाजणार वसुलीचा ढोल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मनपा करसंकलन विभागाने यंदा मालमत्ता कर वसुलीसाठी जोरदार मोहीम उघडल्याने चालू आर्थिक वर्षाच्या २०० कोटी वसूलीच्या उदिष्टापैकी मागील सात महिन्यात १२८ कोटींची वसुली पूर्ण झाली आहे. त्याच वेळी जुन्या ३०० कोटींची थकबाकी डोकेदुखी ठरत आहे.थकबाकीदारांनी योग्य प्रतिसाद न दिल्यास बड्या थकबाकीदारांच्या दारासमोर वसुलीसाठी ढोल बडवला जाणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

- Advertisement -

महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नात मालमत्ता कर महत्वाचा स्त्रोत आहे.मागिल वर्षात करसंकलन विभागाने रेकॉर्डब्रेक १८८ कोटींची मालमत्ता कर वसुलीकरुन उच्चांक गाठला होता. त्या अनुषंगाने आयुक्तांनी मालमत्ता कर विभागाला वसुलीचे यंदा २०० कोटींचे उदिष्ट दिले आहेत.  त्यामुळे विभागाच्या माध्यमातून यंदाही जोरदार मोर्चा उघडला जाणार आहे. त्यातील १२८ कोटींची वसुली पहिल्या सात महिन्यात पूर्ण झाली आहे. गतवेळी आजपर्यंत ही  वसुली ९८ कोटी होती.

त्यावेळी थकबाकी वसुलीसाठी करसंकलन विभागाने ऑक्टोबर महिन्यात दिवाळी अगोदर ढोल बजाओ मोहीम हाती घेतली होती. मोठे थकबाकीदार, संस्था, आस्थापना, कार्यालये त्यांच्या दारापुढे ढोल वाजवत ध्वनिप्रेक्षकावर सबंधिताची थकबाकी सांगितली जाते. चारचौघात अब्रु नको जायला म्हणून थकबाकीदार मालमत्ता कर भरायचा. त्यामुळे दिवाळीनंतर थकबाकी वसुलीने मोठी झेप घेतली होती. यंदा वसुली सुसाट असली तरी जुनी ३०० कोटींची थकबाकी वसुल करण्यावर करसंकलन विभागाने जोर दिला आहे.

शासकीय कार्यालयांच्या वसूलीला गती
महसूल कार्यालयाचे २४८ कोटी थकबाकी जमा झाले आहेत. तीनशे कोटींच्या थकबाकीत शासकीय कार्यालयांची थकबाकीचा मोठा आकडा आहे. त्यांना करसंकलन विभागाने सेवाकर कक्षेत आणले. त्यामुळे त्यांनी थकबाकी अदा करण्याची तयारी दर्शवली असून, त्यांच्यासोबत करारही केला जाणार आहे. महसूल कार्यालयाकडे २.४८ कोटी थकबाकी होती. त्यांनी या रकमेचा भरणा करसंकलन विभागाकडे केला आहे.

तसेच आयकर भवनही १.४८ कोटींची थकबाकीचा पुढिल आठवड्यात भरणा करणार आहे.त्यांच्या करारानंतर ही रक्कम वर्ग केली जाणार असल्याचे समजते. भारतीय प्रतीमुद्रणालयाच्या इमारतीचे मोजमाप करण्यासाठी टीप पाठवण्यात आली असून, त्यांच्या कार्यकक्षेत वावरण्यावर मोठ्या प्रमाणात बंधने असल्याने त्यांच्या तपासणी प्रणालीचा अडथळा दूर झाल्यानंतर मोजणी करुन कर आकारणी केली जाणार आहे. त्यामुळे त्यांच्या वसूलीचाही मोठा फायदा होणार असल्याचे समजते. 

- Advertisment -

ताज्या बातम्या