Friday, May 17, 2024
Homeधुळेनागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांंनी ठोकली धूम

नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांंनी ठोकली धूम

पिंपळनेर । Pimpalner। वार्ताहर

मध्यरात्रीनंतर दार ठोठावत मावशी दार उघड असा आवाज देत घरमालकाच्या सजगतेमुळे (homeowner’s awareness) चोरट्यांनी (thieves) धूम ठोकली.तर पोलीसांना (police) यांची माहिती मिळताच माळी गल्लीत बेवारस दोन दुचाकी (bike) हस्तगत केल्या असून चोरट्यांनी पोलीस येण्याच्या आधीच पोबारा केला. सीसीटीव्हीत (CCTV) चोरटे कैद झाले असून तसे फूटेज हाती लागले आहेत. अज्ञात तीन चार इसमांनी चेहर्‍यावर कापड गुंडाळल्याने ओळख पटत नाही. असे सूर्यकांत दशपूते यांनी सांगितले. तर सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांनी रात्रीची गस्त (Night patrol) वाढवल्याची सांगून नागरिकांनी सजग रहाण्याचे आवाहन केले आहे.

- Advertisement -

हे नाट्य परवा रात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास घडले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिर परिसरातील नागरिकांनी (citizens) अशा चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी लेखी निवेदनाव्दारे केली आहे.

येथे श्री विठ्ठल मंदिरालगत असलेल्या सूर्यकांत दशपूते यांच्या राहत्या घरी दोन दिवसांपूर्वी रात्री एक वाजेनंतर अज्ञात दोन लोकांनी दारावर खटखट (Knock on the door) करीत मावशी दरवाजा उघडा असा आवाज दिल्याने घरात झोपलेले सूर्यकांत उर्फ श्याम दशपूते यांनी समयसूचकता दाखवित जवळ राहणार्‍या लोकांना फोन (Phone) करून सांगितले असता स्थानिक नागरीक एकत्र येताच चोरट्यांनी (thieves) तिथून धूम ठोकली. लागलीच पोलीसांना फोन लावून ही माहिती कळविली.

पोलीस (police) काही वेळेतच तिथे पोहचले. कुस्ती मैदानासमोर काही स्थानिकांना संशयास्पद व्यक्ती नदीच्या दिशेने पळताना दिसल्याचे सांगितले. चोरी करण्याच्या उद्देशाने आणलेल्या दोन बेवारस मोटारसायकली (bike) ही पोलीसानी ताब्यात घेतल्या आहेत. सजगतेमुळे चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांनी पळ काढला. तिथे संशयास्पद आढळून आलेल्या दोन दुचाकी ताब्यात घेतल्या. एम एच 04/एच एच 5784 व एम एच 18बी / टी249 अशा क्रमांकाच्या दुचाकी आहेत. ह्या गाड्या तिथे कशा व कोणी कशासाठी आणल्यात याबाबत विचारणा होत आहे. चोरट्यांच्या उपद्रव वाढू नये व त्यांच्या पासून जीवितास धोका पोहोचू नये यासाठीचे निवेदन श्री विठ्ठल मंदिर संस्थानाधिपती हभप योगेश्वर देशपांडे, श्याम दशपूते यांच्या सह दहा बारा नागरिकांनी पोलीसात लेखी निवेदनाव्दारे मागणी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या