Tuesday, April 29, 2025
Homeनंदुरबारया कारणावरून तरुणाचा धारदार शस्त्राने झाला खून

या कारणावरून तरुणाचा धारदार शस्त्राने झाला खून

नंदुरबार । nandurbar। प्रतिनिधी

नंदुरबार शहरातील मच्छी बाजार परिसरात काल सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास बहिणीशी प्रेमविवाह (love marriage) केल्याच्या कारणावरून धारदार शस्त्राने एका तरुणाचा (youth) खून (murder) केल्याची घटना घडली. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी जमावाला शांततेचे आवाहन करत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. दरम्यान, याप्रकरणी रात्री उशिरा शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

- Advertisement -

सुत्रांच्या माहितीनूसार, मच्छी बाजार परिसरात राहणार्‍या जयेश सोनवणे याच्या बहिणीशी प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून काल दि.3 जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास नंदुरबार शहरातील बोहरी मशिदला लागून असलेल्या रस्त्यावर सातपीर बाबा दर्गाच्या समोर जयेश दयाराम सोनवणे (रा. सां. बा. विभाग कार्यालयाच्या शासकीय निवास्थान, मच्छी बाजार, नंदुरबार) याने त्याचा मेव्हुना मयत अरबाज खाटीक यांच्या छातीत चाकु खुपसून त्यास गंभीर दुखापत करून जिवेठार मारले. दरम्यान खून केल्यानंतर संशयित आरोपी शहर पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला.

याप्रकरणी राज सलिम खाटीक (रा. घरकुल,जिल्हा रुग्णालय जवळ नंदुरबार) यांच्या फिर्यादीवरून जयेश दयाराम सोनवणे रा. सा. बां.विभाग कार्यालयाच्या शासकिय निवास्थान मच्छी बाजार नंदुरबार याच्या विरुद्ध भादवि क 302 506 (2) सह महा. पो. का. चे कलम 37 (1) 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास पोनि रविंद्र कळमकर करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Maharashtra Cabinet Decision : सुधारित पीकविमा योजनेसह राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले...

0
मुंबई | Mumbai मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या अध्यक्षतेखाली आज (मंगळवारी) राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री...