नवी दिल्ली |वृत्तसंस्था| New Delhi
पाच सप्टेंबरपासून सुरू होणार्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेसाठी (Duleep Trophy Tournament) बीसीसीआयच्या निवड (BCCI) समितीने 32 वर्षीय वेगवान गोलंदाजाची निवड केलेली नाही. चार संघांसाठी निवडलेल्या 50 हून अधिक खेळाडूंमध्ये या वेगवान गोलंदाजाला स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे त्याने इंग्लंडला (England) जाऊन काउंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली छाप उमटवणारा तसेच गोलंदाजीच्या जोरावर नाव कमावणारा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट (Jaydev Unadkat) याने पुन्हा एकदा इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट (County Cricket) खेळण्याचा निर्णय घेतला आहे. उनाडकट सलग दुसर्या हंगामात खेळताना दिसणार आहे. शेवटच्या पाच सामन्यांसाठी तो क्लबचा भाग असेल. जयदेव उनाडकट (Jaydev Unadkat) हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये सौराष्ट्रकडून खेळतो. तसेच गेल्या काऊंटी हंगामात ससेक्सकडून तीन सामने खेळला आहे.
वेगवान गोलंदाज उनाडकटने (Jaydev Unadkat) अगदी लहान वयात भारताकडून (India) कसोटीत पदार्पण केले. पण त्यानंतर त्याला बरीच वर्षे बाहेर राहावे लागले. उनाडकटने भारतासाठी 4 कसोटी, 8 एकदिवसीय आणि 10 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहेत. त्याच्या नावावर तिन्ही फॉरमॅटसह एकूण 26 विकेट आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 114 सामन्यात 403 बळी घेतले आहेत.