नेवासा फाटा |वार्ताहर| Newsa
नेवासा-शेवगाव राज्यमार्गावरील (Newasa Shevgav Highway) भानसहिवरा शिवारात असलेल्या एका दूध डेअरीजवळ शनिवार दि.10 रोजी सकाळी पावणेनऊ वाजेच्या सुमारास भरधाव डंपरने (Dumper Hit) रस्त्याच्या विरुद्ध बाजूला उभ्या असलेल्या व्यक्तीस धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू (Death) झाला.
याबाबत माहिती अशी की, भानसहिवरा शिवारात दूध डेअरीजवळ राजेंद्र गंगाधर भोईटे (वय 52) रा. भानसहिवरा (Bhanashivara) हे रस्त्याच्या कडेला उभे होते. त्यांना विरुद्ध बाजूने आलेल्या भरधाव डंपरने जोराची धडक दिली. अपघातात (Accident) जखमी भोईटे यांचा जागीच दुर्देवी मृत्यू (Death) झाला. घटनेनंतर धडक देवून अपघातग्रस्त डंपर पळून जात असताना पुढे जाऊन थोड्याच अंतरावर उलटला. पुन्हा या डंपरला (Dumper) अज्ञात लोकांनी एका जेसीबीच्या सहाय्याने सरळ करुन अपघातग्रस्त ठिकाणाहून पसार केला.
घटनेत जखमी झालेले राजेंद्र भोईटे यांचा या अपघातात मृत्यू (Death) झाल्यानंतर मृतकांच्या नातेवाईकांनी अपघाग्रस्त डंपर आणि चालकाला पोलिसांनी त्वरीत ताब्यात घेवून चालकाला अटक केल्याशिवाय नेवासाफाटा येथील ग्रामिण रुग्णालयातून मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा (Hint) देताच पोलिसांची चांगलीच भंबेरी उडाली.
ही घटना सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडलेली असताना दुपारी 3 वाजेपर्यंतही अपघातग्रस्त डंपर आणि आरोपी चालक पोलिसांकडून ताब्यात घेण्यात न आल्यामुळे मृत्युदेहही थेट उशीरापर्यंत नातेवाईकांनी ताब्यात घेतलेला नव्हता. त्यामुळे पोलीस आणि मृतकाच्या नातेवाईकांमध्ये चांगलीच खडाजंगी उडाल्याचे दिसून आले. शेवटी दुपारी चार वाजेनंतर पोलिसांनी या डंपरचा छडा लावून डंपर आणि चालक ताब्यात घेतल्यानंतर अपघातातील मृतकावर शोकाकूल वातारणात अंत्यसंस्कार करण्यात आले.




