Friday, May 3, 2024
Homeनगरशेतकरी शेतात असलेल्या पिकाची नोंद शासन दरबारी करू शकणार - चितळकर

शेतकरी शेतात असलेल्या पिकाची नोंद शासन दरबारी करू शकणार – चितळकर

भोकर |वार्ताहर| Bhokar

श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यातील भोकर (Bhokar) येथे ‘माझी शेती, माझा सातबारा, मिच नोंदविणार माझा पिक पेरा’ अंतर्गत ‘ई पीक पाहणी’ (E crop inspection) या नव्या सुविधेचे प्रात्यक्षिक नुकतेच संपन्न झाले. यामुळे शेतकर्‍यांना पीक पाहणीची (crop inspection) नोंद करण्यासाठी तलाठी कार्यालयात चकरा मारण्याची गरज भासणार नसून प्रत्येक शेतकरी स्वत: आपल्या शेतात असलेल्या पिकाची नोंद शासन दरबारी करू शकणार असल्याची माहिती कामगार तलाठी अशोक चितळकर (Talathi Ashok Chitalkar)यांनी दिली आहे.

- Advertisement -

ज्या शेतकर्‍याकडे अँडरॉईड मोबाईल (Android mobile) आहे अशा शेतकर्‍यांनी प्रथम ‘ई पिक पाहणी’ (E crop inspection) हे अ‍ॅप डाऊनलोड करायचे आहे. त्यानंतर ई पिक पाहणी नोंदणी या ऑप्शनमध्ये जायचे आहे. त्यानंतर आपला मोबाईल क्रमांक नोदवायचा आहे. त्यानंतर आपला जिल्हा, त्यानंतर आपला तालुका नंतर गाव निवडायचे आहे. त्यानंतर खातेदाराचे नाव नोंदवायचे आहे. त्यात प्रथम पहिले नाव, नंतर मधले नाव व आडनाव याप्रमाणे नोंद करायची आहे.

त्यानंतर खाते क्रमांक किंवा गट क्रमांक, त्या गटातील खातेदार निवडायचा आहे. आपण नोंदविलेल्या मोबाईल कमांकावर येणारा ओटीपी अर्थात सांकेतांक टाकायचा आहे. त्यानंतर मोबाईलमध्ये परिचय, पिकाची माहिती नोंदवा, कायम पड नोंदवा, झाडे नोंदवा, पिक माहिती मिळवा आदी ऑप्शन येतील त्यातील पिकाची माहिती हे ऑप्शन निवडायचे आहे. त्यानंतर खाते क्रमांक गट क्रमांक, क्षेत्र, पोटखराबा, हंगाम, उपलब्ध क्षेत्र, जलसिंचनाचे साधन, जलसिंचनाची पद्धती, लागवडीचा दिनांक यांची नोंद करायची आहे.

त्यानंतर सबमिट केल्यानंतर आपल्या पिकाचा ई कॅमेर्‍याद्वारे फोटो काढून नंतर अपलोड हे ऑप्शन क्लीक करून आपल्या पिकाची नोंदणी करायची आहे. त्यानंतर ती नोंद शासन दरबारी ऑनलाईन (Online) दिसणार व त्यास आमच्या कार्यालयाकडून संमती मिळाल्यानंतर आपली पिक पाहणीची नोंद होणार आहे. असे यावेळी चितळकर यांनी सांगितले. यावेळी उपसरपंच महेश पटारे, क्षत्रीय बेलदार समाज सभेचे युवा राज्य उपाध्यक्ष गणेश छल्लारे, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत झुरंगे, पोलीस पाटील बाबासाहेब साळवे, सोसायटीचे अध्यक्ष सागर शिंदे, राहुल अभंग, प्रहारचे तालुका संघटक दिपक पटारे, प्रताप पटारे, रावसाहेब लोखंडे, भानुदास बेरड, रमेश साठे व राम उघडे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या