Tuesday, September 17, 2024
Homeब्रेकिंग न्यूजराज्यात अनेक जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, ४.५ रिश्टर स्केलची नोंद… केंद्रबिंदू कुठे?

राज्यात अनेक जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, ४.५ रिश्टर स्केलची नोंद… केंद्रबिंदू कुठे?

नांदेड । Nanded

- Advertisement -

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मराठवाड्यातील तीन आणि विदर्भातील एका जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. यासोबतच जमिनीतून गूढ आवाजही आल्याचा दावा नागरिकांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मराठवाड्यातील हिंगोली (Hingoli), परभणी (Parbhani), नांदेड (Nanded) या तीन तर विदर्भातील वाशिम (Washim) या जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही पण यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सकाळी सात वाजून १५ मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवले. परभणी शहर (Parbhani City), सेलू, गंगाखेड या ठिकाणी भूकंप झाला. भूकंपाचा हा धक्का ४.२ रिश्टर स्केल एवढ्या तीव्रतेचा होता. हिंगोली (Hingoli) जिल्ह्यांमध्येही सात वाजून १५ मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला. हिंगोली (Hingoli) मध्ये झालेला भूकंप हा ४.५ रिश्टर स्केल इतका होता.

नक्की वाचा – अंबानींच्या संगीत कार्यक्रमात तेजस ठाकरेंचा डान्स, विरोधकांकडून झाले टीकेचे धनी

हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील पाचही तालुक्यांमध्ये भूकंप झाल्यामुळे नागरिक घाबरले होते. यासोबतच मराठवाड्यालगत असलेल्या वाशिम (Washim) मध्ये सकाळी सात वाजून नऊ मिनिटांनी त्यानंतर सात वाजून १४ मिनिटांनी दोन वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू आखाडा बाळापूरपासून १३ किमीवरील दांडेगाव परिसर असल्याचे सांगितले जात आहे.

भूकंपादरम्यान काय करावे?

भूकंप परिस्थिती निर्माण झाल्यास अधिकाधिक सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करा. कधीकधी सुरुवातीला भूकंपाचा लहान धक्का बसतो व त्यानंतर त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता असते. अशावेळी कमीत कमी हालचाल करुन सुरक्षित स्थळी पोहोचावे आणि जमिनीची हालचाल थांबेपर्यंत घरात/वास्तूत थांबावे व लगेचच बाहेर पडून सुरक्षित जागी जावे.

घरामध्ये असाल तर..

  • जमिनीवर बसा; अभ्यासाचं टेबल किंवा कोणत्याही एखाद्या फर्निचरखाली जाऊन स्वतःला झाकून घ्या आणि जमिनीची हालचाल थांबेपर्यंत तेथेच थांबा. तुमच्या आसपास कुठे टेबल किंवा डेस्क नसेल तर घराच्या एखाद्या कोपऱ्यात खाली बसून दोन्ही हात गुडघ्यभोवती गुंडाळून त्यात तुमचा चेहरा झाकून घ्या.
  • आतला दरवाज्याची चौकट, खोलीचा कोपरा, टेबल किंवा पलंगाच्या खाली थांबून स्वतःचे रक्षण करा.
  • काचा, खिडक्या, बाहेरील दरवाजे आणि भिंती किंवा कोसळू शकणाऱ्या कोणत्याही गोष्टीपासून लांब राहा.
  • भूकंप आला असेल आणि तुम्ही अंथरुणात असाल तर तेथेच थांबवा. स्वतःचे डोके आणि चेहरा उशीने झाकून तेथेच थांबा. मात्र छतावर असलेली एखादी अवजड वस्तू खाली कोसळत नाहीये याची खात्री करा. अशावेळी एखाद्या जवळच्या सुरक्षित स्थळी जाऊन थांबा.
  • जवळ असणाऱ्या एखाद्या प्रवेशद्वाराचा निवाऱ्यासाठी वापर करा. मात्र, या प्रवेशद्वाराचा मजबूत आधार मिळेल ही खात्री करुन घ्या.
  • जमिनीची हालचाल थांबेपर्यंत आतच थांबा आणि मग बाहेर जा. भूकंप आल्यानंतर लोक बाहेर पडून इतर ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतानाच जखमी होतात असे अनेक संशोधनाअंती आढळून आले आहे.
  • भूकंप आल्यानंतर वीज पसरु शकते किंवा स्प्रिंकलर सिस्टम्स किंवा फायर अलार्म्स सुरु होऊ शकतात.

 नक्की वाचा : IMD कडून राज्यातील ‘या’ चार जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ जारी

घराबाहेर असाल तर..

  • तुम्ही सध्या असाल त्या जागेवरुन कुठेही हलू नका. मात्र, इमारती, झाडे, पथदिवे आणि विजेच्या तारांपासून दूर व्हा.
  • जर तुम्ही मोकळ्या जागेवर असाल, तर भूकंपाचे धक्के कमी होईपर्यंत तिथेच थांबा. इमारतीबाहेरची जागा, बाहेर पडण्याची ठिकाणी आणि बाहेरील भिंतीशेजारी मोठा धोका असतो. भूकंपाचा परिणाम म्हणून बऱ्याचददा भिंती कोसळतात, काचा फुटतात आणि वस्तू जागेवरुन पडतात असे आढळून आले आहे.

चालत्या वाहनात असाल तर…

  • सुरक्षित ठिकाण पाहून लगेच वाहन थांबवा आणि तुम्हीदेखील वाहनाच्या आत थांबा. मात्र, इमारती, झाडे, विजेच्या तारांजवळ थांबू नका. • भूकंप थांबल्यानंतर हळूहळू वाहन सुरु करा. भूकंपाचा धक्का बसलेले रस्ते, पूल आणि उतारावरुन जाण्याचे टाळा.

ढिगाऱ्याखाली अडकले असाल तर…

  • काडी पेटवू नका.
  • धूळीखाली असताना हलू नका किंवा ढिगाऱ्याला लाथा मारु नका
  • हातरुमाल किंवा कपड्याने आपले तोंड झाकून घ्या.
  • जवळचा पाईप किंवा भिंत वाजवा जेणेकरुन बचावकार्य करणाऱ्या लोकांना तुम्हाला शोधता येईल. एखादी व्यक्ती जवळ असेल तर शिटी वाजवा. शेवटचा उपाय म्हणून आरडाओरडा करा. कारण असे केल्यास तुमच्या शरीरात धोकादायक प्रमाणात धूळ जाण्याची शक्यता आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या