Monday, May 20, 2024
Homeदेश विदेशजम्मू-काश्मीरमध्ये जमीन हादरली ; २४ तासांत सहा वेळा भुकंपाचे धक्के

जम्मू-काश्मीरमध्ये जमीन हादरली ; २४ तासांत सहा वेळा भुकंपाचे धक्के

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi

जम्मू-काश्मीर (Jammu Kashmir) आणि लडाखमध्ये (Ladakh) गेल्या २४ तासांत सुमारे सहा वेळा भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणवले. तर जम्मू-काश्मीरमध्ये अवघ्या 11 मिनिटांच्या अंतराने दोनदा भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ४.५ रिश्टर स्केलवर इतकी होती.

- Advertisement -

जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी दुपारी २ वाजून ०३ मिनिटांनी ३.० तीव्रतेच्या भूकंपानंतर पहिला हादरा जाणवला तर कटरा येथे रविवारी भूकंपाचे धक्के जाणवले. लेहमध्ये रात्री ९.४४ च्या सुमारास भूकंपाचा दुसरा धक्का जाणवला असून त्याची तीव्रता ४.५ रिश्टर स्केल होती. तर तिसरा हादरा जम्मू आणि काश्मीरमधील डोडा (Doda) येथे भारत-चीन सीमेजवळ रात्री ९.५५ वाजता बसला होता त्याची तीव्रता ४.४ रिश्टर स्केल इतकी होती.

Ameesha Patel : अमिषा पटेलवर आली तोंड लपवण्याची वेळ, जाणून घ्या नेमकं प्रकरण

दरम्यान, या पूर्वीही लडाखच्या लेहमध्ये भूकंपाचे अनेक धक्के जाणवले होते. जम्मू-काश्मीरमधील रामबन आणि डोडा जिल्ह्यात शनिवारी सौम्य तीव्रतेचे दोन भूकंप झाले असून यासोबतच लेह-लडाखमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपामुळे सुदैवानेअद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

अंबरनाथमध्ये रेल्वे ट्रॅकवरून घसरली, मध्यरेल्वेची वाहतूक विस्कळीत

दरम्यान, नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) नुसार, भूकंप दुपारी २.१६ वाजता झाला. मिळालेल्या माहितीनुसार, या भूकंपामुळे कोणतीही जीवित आणि वित्तहानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही. आजच्या भूकंपाचा केंद्रबिंदू जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गालगतच्या डोंगराळ रामबन जिल्ह्यात होता, असं हवामान विभागाने सांगितलं. भूकंपाची खोली पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ५ किलोमीटर होती. यादरम्यान काही घरांना भेगा पडल्याचे दिसून आले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -

ताज्या बातम्या