Wednesday, May 22, 2024
Homeनगरपशुखाद्य खाल्ल्याने तीन गोठ्यातील जनावरांना विषबाधा

पशुखाद्य खाल्ल्याने तीन गोठ्यातील जनावरांना विषबाधा

उंबरे |वार्ताहर| Umbare

राहुरी (Rahuri) तालुक्यातील ब्राम्हणी (Brahmani) परिसरात तीन गोठ्यातील गायांना (cows) वालिस खाल्ल्याने विषबाधा (Poisoning) झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जनावरांवर पुढील उपचार सुरू आहेत. त्यासाठी मोठा खर्च (Expenses) होत आहे. परिणामी पशुपालक (Pastoralist) शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका (Big Financial Blow to Farmers) बसला आहे. याशिवाय दैनंदिन दुधात (Milk) मोठी घट झाली आहे. विशेष म्हणजे वालीस एक नामांकित कंपनीचे आहे. या प्रकरणी संबंधित दुकानदार विक्रेते व कंपनी या प्रकरणी काय भूमिका घेणार? याकडे आता पशुपालक शेतकर्‍यांचे लक्ष लागून आहे.

- Advertisement -

संबंधित विक्रेते व नुकसानग्रस्त पशुपालक (Damaged pastoralists) यांचा जबाब घेऊन खुलासा सादर करण्याच्या सूचना तालुकास्तरावर देण्यात आल्या असल्याची माहिती पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे (Deputy Commissioner of Animal Husbandry Dr. Sunil Tumbare) यांनी दिली.

पशुपालक अजित दिनकर बानकर म्हणाले, गोठ्यातील 20 लहान-मोठ्या जनावरांना विषबाधा (Poisoning) झाली. उपचार सुरू आहेत. दर अर्ध्या तासाला स्प्रे द्यावा लागतो. 40-50 हजार रुपये खर्च आला. पुढे काय? याची धास्ती कायम आहे.

ब्राम्हणी व चेडगाव परिसरातील दोन गोठ्यातील जनावरांचा समावेश आहे. मोठ्या प्रमाणात वालिस देण्यात आलेल्या जनावरांना याचा त्रास अधिक झाला.दरम्यान दूध कमी झाले. तर कमी वालीस देण्यात आलेल्या गायींना त्रास कमी झाला. पशुपालकांनी वालीस चारताना काळजी घ्यावी. काही लक्षणे दिसून आल्यास लगतच्या पशुवैद्यकीय सेवकांना कळवावे.

– डॉ. हर्षद ईनामदार

ज्या वालीसामधून जनावरांना विषबाधा झाली ते नामांकित कंपनीचे वालीस गुपचूप अन् रातोरात ब्राह्मणी गावातून गायब करण्यात येत आहे. ब्राह्मणी गावातील काही विक्रेत्यांनी गाडी भरून देण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे.स्वतःची अडचण दूर करण्याचा केविलवाणा प्रयत्न त्या विक्रेत्यांकडून सुरू असल्याचे दिसून येत आहे. विक्रेत्यांनी त्या मालाची कितीही विल्हेवाट लावली तरी त्या मोठ्या नुकसानीचे काय? असा संतप्त सवाल नुकसानग्रस्त पशुपालकांमधून उपस्थित होत आहे. मालाची विल्हेवाट लावून कंपनीची पाठराखण करण्यापेक्षा आपल्याला स्थानिक ग्राहक महत्त्वाचा आहे. असा सूर उमटत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या