Friday, May 17, 2024
Homeदेश विदेशखाद्य तेलाच्या किमतीत घसरण

खाद्य तेलाच्या किमतीत घसरण

नवी दिल्ली | New Delhi

गेल्या अनेक महिन्यांनंतर आत देशांतर्गत बाजारात मोहरी, शेंगदाणा, सोयाबिन, पामोलिनसह सर्व खाद्यतेलाच्या किमतीत घसरण होताना दिसते आहे. परंतु परदेशात तेलाच्या किमती अद्यापही कमी झालेल्या नाहीत.

- Advertisement -

देशांतर्गत बाजारात सोयाबीन, मोहरी, शेंगदाणा, पामोलिन यासह अनेक खाद्यतेलाच्या दरात प्रतिलीटर 7 ते 10 रुपयांची घसरण झाली आहे. जाणकारांनुसार, इंडोनेशियाने निर्यात उघडल्यानंतर ही घसरण झाली आहे. सोयाबीन आणि पामोलिन तेलाच्या किमती जवळपास 100 डॉलरने कमी झाल्या आहेत. पण परदेशात अद्यापही सूर्यफूल तेलाच्या किमती वाढलेल्याच आहेत.

भारतात देशांतर्गत बाजारातील महागाईमुळे सर्वसामान्यांच्या घरातील बजेट कोलमडलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च तेल, गॅस आणि इतर वस्तूंच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. पण वाढत्या महागाईत मोदी सरकारने काही दिलासा दिला. नुकताच इंडोनेशिय सरकारने 23 मेपासून पाम तेलाच्या निर्यातीवरील बंदी हटवण्याची घोषणा केली. त्याचाच परिणाम खाद्य तेलाच्या किमतीवर पाहायला मिळतो आहे.

गेल्या काही महिन्यांपासून परदेशात खाद्यतेल महाग झाल्याने आयात कमी झाली होती. त्याचा परिणाम भारतातील किमतीवर झाला. परंतु आता स्थानिक मागणी सोयाबीन, भुईमूग, कापूस आमि मोहरीने भागवली जात आहे. तसंच इंडोनेशियाने तेलाच्या किमती सुमारे 100 डॉलरने कमी केल्या आहेत. यातून आयातही सुरू झाली आहे. येत्या काही दिवसांत इंडोनेशियातून तेलाची आवक झाल्यानंतर खाद्यतेलाच्या किमती आणखी घसरण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या