Monday, July 22, 2024
Homeनगरकरोनाने शिक्षण क्षेत्रासह जग बदलले

करोनाने शिक्षण क्षेत्रासह जग बदलले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

करोनाने शिक्षण क्षेत्रासह जग बदलले. (Corona changed the world with the field of education) करोनाच्या संकटाचा सामना करत असताना नव-नवीन शिकण्यास मिळाले. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शाळा ऑनलाईन (School Online) झाली. येणारी आपत्ती संधी देखील घेऊन येत असते. संकटांचा सकारात्मक पध्दतीने सामना करण्याचे आवाहन लखनऊ व नांदेड विद्यापिठाचे माजी कुलगुरु सर्जेराव निमसे (Former Vice Chancellor of Lucknow and Nanded University Sarjerao Nimse) यांनी केले.

अहमदनगर एज्युकेशन सोसायटी (Ahmednagar Education Society) व रोटरी क्लब ऑफ नगर प्रियदर्शनी (Rotary Club of Nagar Priyadarshani) यांच्या संयुक्त विद्यमाने अ.ए.सो.चे माजी कार्यवाह स्व. अशोकभाऊ फिरोदिया यांच्या जयंतीनिमित्त शहरातील शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी कोविड काळानंतरचे शिक्षण (Education after the Covid period) या विषयावर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन (Conducting workshops) करण्यात आले होते. या कार्यशाळेत अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना निमसे बोलत होते.

या कार्यक्रमास संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, खजिनदार प्रकाश गांधी, नियामक मंडळाच्या सदस्या सुनंदाताई भालेराव, रोटरी प्रियदर्शनीच्या शशी झंवर, लिटरसी सचिव प्रतिभाताई धूत, सचिव देविका रेळे, कुंदा हळबे, गिता गिल्डा, पांडे मॅडम यांची उपस्थिती होती. निमसे यांनी करोनानंतरची शिक्षण पध्दतीला सकारात्मकपणे सामोरे जाण्याचे शिक्षकांना आवाहन केले. तर कार्यशाळेस उपस्थित असलेले शाळांचे अध्यापक, मुख्याध्यापक यांनी उपस्थित केलेले विविध प्रश्न व शंकांचे निरसन त्यांनी केले.

छायाताई फिरोदिया यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे मुख्याध्यापक उल्हास दुगड यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. धूत यांनी उपस्थितांचे स्वागत केले. रोटरी प्रियदर्शनीच्या अध्यक्षा झंवर यांनी रोटरीच्या माध्यमातून सुरु असलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या अध्यापिका अपर्णा हतवळणे यांनी केले. रूपीबाई मोतीलालजी बोरा न्यू इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या कुसुम मावची यांनी आभार मानले. करोना नियमांचे पालन करुन ही कार्यशाळा पार पडली. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक, अध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या