Friday, November 15, 2024
Homeनाशिकशैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अमलबजावणीचे प्रयत्न

शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अमलबजावणीचे प्रयत्न

नाशिक । प्रतिनिधी Nalshik

ज्ञानप्रवाह निर्माण करणे, तो सर्व घटकांपर्यंत पोहोचणे आणि भारतीय मूल्यांसोबतच वैश्विक मूल्यांचे भान येणे ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची महत्वाची उद्दिष्ट्ये आहेत. या तत्वांच्या माध्यमातून शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विविध घटकांच्या सहभागातून प्रयत्न करायचे आहेत, असे प्रतिपादन कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी केले.

- Advertisement -

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताहा’निमित्त व्याख्यानमाला आयोचित करण्यात आली आहे. ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची उच्च शिक्षणासाठी अंमलबजावणी’ या विषयावर कुलगुरू डॉ. सोनवणे बोलत होते. विकसित भारताच्या गरजा पूर्ण करताना सजग नागरिक घडवण्याचा उद्देश राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून साधला जातो आहे. ज्ञानसमाज निर्माण करण्यासाठी हे धोरण महत्त्वाची भूमिका बजावेल. शिक्षक व शिक्षण क्षेत्रातील अन्य घटकांनी धोरण व्यवस्थित समजून घ्यावे आणि विद्यार्थी-पालकांनाही व्यवस्थित समजावून सांगावे. तरच धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होईल, असेही प्रा. सोनवणे म्हणाले.

विद्यापीठ व्यवस्थापन मंडळाचे सदस्य प्रा. जयदीप निकम यांनी प्रास्ताविक केले. आगामी आठवडाभर होणारी व्याख्याने व उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. कुलसचिव भटूप्रसाद पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. सुजाता मोरे यांनी सूत्रसंचालन केले.

आज ऑनलाईन व्याख्यान

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताहाअंतर्गत आज (दि.27) दुपारी 2.30 वाजता सूकाणू समितीचे सदस्य महेश दाबक यांचे ‘उद्योगक्षेत्रातील इन्टर्नशीप व अ‍ॅप्रेन्टीशीपच्या संधी’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या