Tuesday, May 21, 2024
HomeनाशिकNashik News : पाण्यात बुडून आठ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Nashik News : पाण्यात बुडून आठ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

येथून जवळच असलेल्या जाखोरी गावाजवळील (Jakhori Village) चांदगिरी (Chandgiri) येथे घरासमोर असलेल्या कडवा कालव्यात (Canal) पोहण्यासाठी गेलेल्या एका आठ वर्षाच्या बालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे…

- Advertisement -

Nashik News : समृद्धीवर शेतकऱ्यांचा रास्ता रोको; आश्वासनांची पूर्तता करण्याची मागणी

याबाबत अधिक माहिती अशी की, कार्तिक शिवाजी शेलार (वय ८) रा.शेलार गल्ली, चांदगिरी हा मुलगा घराजवळ (Home) असताना जवळच असलेल्या कडवा कालव्यामध्ये पोहण्यासाठी (Swim) गेला होता. परंतु, पाणी जास्त असल्याने सदर बालकाला अंदाज न आल्यामुळे त्याचा पाण्यात बुडून मृत्यू (Death by Drowning) झाला.

Ajit Pawar : “… तरच भाजपा अजित पवारांना मुख्यमंत्री बनवेल”; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा

दरम्यान, ही घटना नातेवाईक व आजूबाजूच्या नागरिकांना समजताच त्यांनी तातडीने त्याला बाहेर काढले व उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. या घटनेप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Raj Thackeray : “चांद्रयान चंद्रावर पाठवून काय उपयोग, तिथे जाऊन…”; मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरून राज ठाकरेंचे सरकारवर टीकास्र

- Advertisment -

ताज्या बातम्या