Monday, March 17, 2025
Homeनगरएकलहरेत 20 वर्षीय युवक बिबट्याच्या हल्ल्यातून बचावला

एकलहरेत 20 वर्षीय युवक बिबट्याच्या हल्ल्यातून बचावला

टिळकनगर |वार्ताहर| Tilaknagar

तालुक्यातील एकलहरे (Eklahare) येथे आज सायंकाळी 20 वर्षीय युवक बिबट्याच्या हल्ल्यातून (Leopard Attack) बालंबाल बचावला. ही संपुर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे.

- Advertisement -

नगर-मनमाड मार्ग दुरुस्त करून वाहतूक योग्य करा

आज संध्याकाळी साडे सात वाजेच्या सुमारास सोसायटीचे माजी संचालक अनिल विश्वासे यांची आई व मुलगा प्रज्वल विश्वासे घराबाहेर बसले होते. बिबट्याने (Leopard) घराच्या समोरच्या बाजूने अतिशय वेगाने हल्ला केला. प्रज्वलने बिबट्याला पहाताक्षणी जोरात आरडाओरडा करून घरात प्रवेश केला. तोपर्यंत बिबट्याने लगद असलेल्या शेतातून धूम ठोकली.

यापुढे सशुल्क पाससाठी साईभक्तांना आधार व मोबाईल नंबर बंधनकारक

घटनेचे गांभीर्य ओळखून सरपंच पती अनिस शेख यांनी घटनास्थळी धाव घेत वनविभागाला (Forest Department) याबाबद माहिती दिली. वनविभागाने तात्काळ परिसरात पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे अशी, मागणी ज्येष्ठ पत्रकार लालमोहमद जहागीरदार, सरपंच रिजवाना शेख, उपसरपंच रमेश कोल्हे, ग्रामपंचायत सदस्या नसीमखातून जहागीरदार, अनुसया इंगळे, बेबी रावण निकम सह आदींनी केली आहे.

ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने तरुणाचा मृत्यू; कुठे घडली घटना ? बेलापूरच्या ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्षपदावरून तंटा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Raj Thackeray : “माझ्यावर शिवचरित्राचा प्रभाव, ना नैराश्याचा स्पर्श, ना…”; ‘शिवजयंती’निमित्त...

0
मुंबई । Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती (तिथीप्रमाणे) आज राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. शिवजयंतीनिमित्त ठिकाठिकाणी वेगवेगळ्या संस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेले आहे....