Friday, November 15, 2024
Homeमुख्य बातम्याखडसे यांचा दावा : १० आमदार व १५ माजी आमदार आपल्यासोबत

खडसे यांचा दावा : १० आमदार व १५ माजी आमदार आपल्यासोबत

मुंबई

एकनाथ खडसे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी दुपारी त्यांचा पक्षप्रवेश पार पडणार आहे. आपल्यासोबत १० आमदार व १५ माजी आमदार आहेत. तसेच जि.प.सदस्य काही नगराध्यक्ष, सहकारी संस्थांचे पदाधिकारी आहेत, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला.

- Advertisement -

एका वृत्तवाहिनीशी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, १० आमदार व १५ माजी आमदार आपल्यासोबत आहेत. परंतु आमदार सध्या येणार नाहीत. मात्र, काही माजी आमदार आताच राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. तसेच जि.प.सदस्य काही नगराध्यक्ष, सहकारी संस्थांचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत, असा दावा खडसे यांनी केला.

फडणवीस यांच्या टीकेवर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, अजित पवार यांच्यासोबत पहाटे शपथ घेतली तर नैतिक आणि आम्ही राष्ट्रवादीसोबत गेलो तर अनैतिक हा कोणता न्याय आहे, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या