Wednesday, January 7, 2026
HomeराजकीयEknath Khadse: जावई रेव्ह पार्टीत सापडले! एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाले…

Eknath Khadse: जावई रेव्ह पार्टीत सापडले! एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाले…

मुंबई । Mumbai

पुण्यातील खराडी परिसरात पोलिसांनी एका रेव्ह पार्टीवर धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणाने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे जावई आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांचा पती प्रांजल खेवलकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेनंतर खडसे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

- Advertisement -

खडसे यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वातावरणामुळे अशा घटनेची शक्यता त्यांना वाटत होती. “काही लोक अडचणीत आहेत आणि आता ते अंतिम टप्प्यात येत आहेत. मी यावर जास्त बोलणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी ही माहिती प्रसारमाध्यमांमधूनच मिळाल्याचे सांगितले, कारण त्यांचे जावई सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि त्यांच्याशी संवाद झालेला नाही.

YouTube video player

खडसे यांनी पोलिसांना निष्पक्ष तपासाची मागणी केली आहे. “जर ही खरी रेव्ह पार्टी असेल आणि त्यात माझे जावई दोषी असतील, तर मी त्यांचे समर्थन करणार नाही. पण पोलिसांनी प्रामाणिकपणे तपास करावा,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच, फॉरेन्सिक आणि रक्त तपासणी अहवाल येण्याची वाट पाहावी लागेल, असेही त्यांनी नमूद केले. अपुऱ्या माहितीवर कोणताही निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल, असे त्यांचे मत आहे.

“जावई असो वा कोणीही, जर दोषी असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे. पण कुणाला खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही त्याचा कडाडून विरोध करू,” असे खडसे यांनी स्पष्ट केले. पोलिसांवर जनमानसात असलेला अविश्वास आणि त्यांच्या कार्यपद्धतीबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. सर्व अहवाल प्राप्त झाल्यानंतरच यावर सविस्तर भाष्य करता येईल, असे त्यांनी शेवटी सांगितले.

या प्रकरणाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पोलिसांचा तपास आणि येणारे अहवाल या प्रकरणाला नवीन वळण देऊ शकतात. दरम्यान, खडसे यांच्या या प्रतिक्रियेमुळे विरोधकांना नवे मुद्दे मिळण्याची शक्यता आहे. पोलिस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, लवकरच अधिक माहिती समोर येणे अपेक्षित आहे.

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : फोटो मॉर्फिंगद्वारे राजकीय हल्ला; माजी नगरसेवकाची...

0
नाशिक | प्रतिनिधी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आता तंत्रज्ञानाची धोकादायक जोड मिळाल्याचे सिडकोतील (Cidco) एका प्रकारातून उघड झाले आहे. एआयचा वापर करून...