Friday, February 6, 2026
HomeराजकीयEknath Shinde : एकनाथ शिंदे वाढदिवस साजरा करणार नाहीत; कारण काय ?

Eknath Shinde : एकनाथ शिंदे वाढदिवस साजरा करणार नाहीत; कारण काय ?

मुंबई । Mumbai

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अत्यंत वेदनादायी आणि दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला ९ फेब्रुवारी रोजीचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण राज्य सध्या शोकाकुल परिस्थितीत असताना कोणताही उत्सव, सोहळा किंवा जल्लोष करणे योग्य ठरणार नाही, अशी संवेदनशील भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली आहे.

- Advertisement -

अजित पवार यांच्या जाण्याने निर्माण झालेल्या परिस्थितीवर भाष्य करताना एकनाथ शिंदे भावूक झाले. त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “अजित दादांच्या जाण्याच्या धक्क्यातून महाराष्ट्र अजूनही सावरलेला नाही. मी वैयक्तिकरित्या माझा एक अत्यंत जवळचा सहकारी आणि विश्वासू मित्र गमावला आहे. राजकारणातील ही अपरिमित हानी कधीही भरून न येणारी आहे.” या कठीण काळात आपण पवार कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून त्यांच्या दुःखात पूर्णपणे सहभागी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

YouTube video player

राज्यातील सद्यस्थिती आणि गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते, हितचिंतक आणि समर्थकांना कळकळीचे आवाहन केले आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त कोणीही पुष्पगुच्छ, महागड्या भेटीवस्तू आणू नयेत किंवा शहरात कुठेही शुभेच्छा देणारे मोठे होर्डिंग्ज लावू नयेत, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या आहेत. तसेच, यंदा वाढदिवसानिमित्त कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाचे किंवा समारंभाचे आयोजन करून गर्दी करू नये, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

सेवा बजावताना वीरमरण, पारनेरच्या सुपुत्राला शासकीय इतमामात अखेरचा निरोप; डोळे पाण्याने...

0
पारनेर । तालुका प्रतिनिधी पारनेर तालुक्यातील विरोली येथील सीमा सुरक्षा दलाचे (BSF) जवान प्रशांत अशोक बुचुडे (वय २७) यांना देशरक्षणाचे कर्तव्य बजावत असताना नागालँडमध्ये वीरमरण...