Tuesday, January 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजते तिजोरीवर दरोडा टाकणारे 'रहमान डकैत', तर आम्ही पाणी पाजणारे 'धुरंधर'; एकनाथ...

ते तिजोरीवर दरोडा टाकणारे ‘रहमान डकैत’, तर आम्ही पाणी पाजणारे ‘धुरंधर’; एकनाथ शिंदेंची सभागृहात तुफान फटकेबाजी

नागपूर | Nagpur
विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे आज सूप वाजले. एकूण सात दिवस चाललेल्या या अधिवेशनात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन दिवस हजेरी लावली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेत्याची निवड होण्यासाठी अध्यक्षांची भेट देखील घेतली. विचार और विश्वास बेचने वाला कभी सच्चा वारीस नहीं हो सकता, अशी शायरी करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.

अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, संपूर्ण अधिवेशनात विरोधकांनी विरोधी पक्षनेते पदाशिवाय दुसरी कोणतीही चर्चा केली नाही, हे दुर्देवं आहे. पण विरोधकांकडे संख्याबळ नाही ही आमची चूक नाही. तो जनतेने दिलेला कौल आहे आणि तो कौल त्यांनी स्वीकारला पाहिजे. पण काही लोक बाहेर बोलतात आणि याठिकाणी सभागृहात येऊन बोलत नाहीत. आम्हाला देखील आरोप करता येतात. मात्र, आम्ही खालच्या पातळीवर जाऊन बोलत नाहीत. अंगात नही बळ अन् चिमटा काढून पळ, अशी परिस्थिती काही लोकांची आहे असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर निशाणा साधला.

- Advertisement -

ते मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे रहमान डकैत
आम्ही मुंबईचे रस्ते धुतले, तिजोरी कधीही धुतली नाही असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. कोविड असो वा मिठी नदी, प्रत्येक ठिकाणी यांनी दरोडा घातला. ते मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे रहमान डकैत आहेत, तर आम्ही त्यांना पाणी पाजणारे धुरंधर आहोत असे म्हणत शिंदेंनी ठाकरेंना टोला लगावला. मुंबईची तिजोरी लुटणाऱ्या असल्या रहमान डकैताना पाणी पाजणारी ‘धुरंधर’ महायुती आहे. इलाका किसी का भी हो, धमाका महायुती करेगा. ‘हमारी सारी योजना हैं गेम चेंजर, कॉर्पोरेशन का इलेक्शन जित कर हम ही होंगे धुरंधर’ अशी शायरीतून टोलेबाजी शिंदेंनी केली.

YouTube video player

एकनाथ शिंदे म्हणाले की, “माझं नाव घेतल्याशिवाय काहींचा दिवस सुरू होत नाही आणि संपतही नाही. मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही आणि उपमुख्यमंत्री आहे तर आताही मला घटनाबाह्य म्हणतात. महाविकास आघाडीच्या काळात अजितदादा उपमुख्यमंत्री होतेच ना? कितीही म्हटले, आदळआपट केली तरी माझं काम चालूच आहे. सर्वसामान्य घरातील व्यक्ती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री झाला म्हणून ही जळजळ आहे. ‘न मैं गिरा न मेरे हौसले गिरे, पर मुझे गिराने वाले कई बार गिरे’.”

समुद्रात यापुढे काळे पाणी जाणार नाही. मुंबईतील राजकीय प्रदूषणही दूर करू. वर्सोवा-भाईंदर कोस्टल रोडला मान्यता मिळाली आहे. मुंबईत पॉड टॅक्सी देखील होणार आहे. बिकेसी ते नवी मुंबई विमानतळ भुयारी भोगदा करतोय. विरार ते वाढवणपर्यंत आपण रस्ते करतोय अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

एक बार मैने कमिटमेंट कर दी तो मैं खुद की भी सुनता नहीं
विरोधकांवर टीका करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, काही लोकांनी कर्ज माफीचा विषय काढला, पण आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा शब्द दिलेला आहे. आम्ही कर्जमाफीचा शब्द महायुतीच्या जाहीरनाम्यात दिलेला आहे. त्यामुळे सगळं बरोबर होईल. कारण विरोधक म्हणाले होते की, लाडकी बहीण योजना यशस्वी होणार नाही. पण लाडकी बहीण योजना यशस्वी झाली. मात्र, सभागृहातील काही लोक तर त्या योजनेच्या विरोधात न्यायालयात गेले होते. पण त्या लोकांना न्यायालयाने चांगलीच चपराक लगावली. कारण आम्ही जे बोलतो ते करतो. “कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट. मैं एक तो कमिटमेंट करता नहीं, लेकिन एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो मैं खुद की भी सुनता नहीं.” कर्जमाफी आम्ही करणार, त्यामुळे चिंता करण्याचं काही कारण नाही. सर्वांनी मिळून शेतकऱ्यांच्या पाठिमागे उभं राहिलं पाहिजे. त्याबाबत राजकारण करता कामा नये. आम्ही शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही म्हणालो होतो आणि आम्ही आमचा शब्द पाळला, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी मांडली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

अज्ञात वाहनाच्या धडकेत दाम्पत्याचा मृत्यू

0
सटाणा | प्रतिनिधी Satana साक्री-शिर्डी रस्त्यावर ढोलबारे गावाजवळ मोटरसायकलला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत पती-पत्नी जागीच ठार झाले. संदीप गावित(३५) व आशाबाई संदीप गावित(३२) रा. अमली...