Friday, April 25, 2025
HomeनाशिकPolitical : एकनाथ शिंदे नाराज नाहीत! - उदय सामंत यांचा खुलासा

Political : एकनाथ शिंदे नाराज नाहीत! – उदय सामंत यांचा खुलासा

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

महायुती सरकारच्या स्थापनेबाबत दिल्लीत झालेली चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती खुद्द एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे कुठेही नाराज नाहीत. राज्यात महायुतीच्या तीन नेत्यांची पुन्हा एकदा चर्चा होईल आणि लवकरात लवकर मंत्रिमंडळ स्थापन होण्याचा निर्णय होईल, अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

- Advertisement -

हे देखील वाचा  देशदूत ई-पेपर नाशिक २९ नोव्हेंबर २०२४

खाते वाटपाबाबत बातम्या येतात तशी चर्चा झाली नसावी, असे सांगतानाच शिंदेंना सन्मानपूर्वक चर्चेला बोलवले होते. दिल्लीत सन्मानपूर्वक चर्चा झाली. एखादा फोटो बघून शिंदे नाराज आहेत हे तुम्ही कसे ओळखले हे फार मोठे कोडे आहेत. एकनाथ शिंदे नाराज नाहीत, असेही सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.

हे देखील वाचा – Eknath Shinde : महायुतीची मुंबईतील बैठक रद्द! काळजीवाहू CM एकनाथ शिंदे मूळगावी जाणार

एकनाथ शिंदेंनी राज्यातच राजकारण केले पाहिजे, त्यांनी सरकारमध्ये राहिले पाहिजे, अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. राज्याचे पहिले नेतृत्व कुणी करावे याबाबत आम्हाला विचारले तर आमची इच्छा शिंदेंनी नेतृत्व करावे अशीच आहे. कोणत्याही पदापेक्षा मी लाडका भाऊ झालो यात मला अभिमान आहे, यात मला समाधान आहे असे शिंदे सांगतात. त्यातून सगळ्यांनी आदर्श घ्यायला हवा, असे उदय सामंत म्हणाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...