मुंबई । Mumbai
विधानसभेच्या निकालाला आठवडा उलटल्यानंतरही अद्याप महायुतीच्या चर्चा आणि बैठकांचे सत्र सुरूच आहे. याच दरम्यान आज मुंबईत होणारी महायुतीची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे.
दोन दिवसानंतर अमित शाहांचा फोन आल्यानंतर पुन्हा बैठक होईल असं सांगण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे साता-याला आपल्या गावी गेल्यामुळे महायुतीची बैठक होणार नसल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्रिपदासंदर्भात काल (दि.28) रात्री दिल्लीत अमित शाह (Amit Shah) यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत अमित शाह यांनी विविध सूचना दिल्या. या बैठकीत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित होते.
त्यानंतर आज मुंबईत पुन्हा महायुतीची बैठक होणार होती. मात्र अचानकपणे महायुतीची ही बैठक रद्द करण्यात आली असून, महायुतीची आज होणारी बैठक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. नेमकी ही बैठकी कोणत्या कारणामुळे रद्द करण्यात आली आहे याबाबत कोणतेही ठोस कारण समोर आलेले नाही.