Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यादेवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना; ठाकरे सरकार कोसळणार?

देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना; ठाकरे सरकार कोसळणार?

मुंबई । Mumbai

राज्यसभा निवडणूक (Rajya Sabha) आणि विधान परिषद (Vidhan Parishad) निवडणुकांच्या (Election) घोषणेपासूनच राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत. राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेतही भाजपनं (BJP) आपली जादू दाखवत महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का दिला आहे.

- Advertisement -

याच दरम्यान राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून शिवसेनेतील मोठे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) त्यांच्या गटातील आमदारांसह नॉट रिचेबल असल्याची माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदे सुरतमधील ली मेरिडिअन या हॉटेलमध्ये असल्याची माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदे निकालानंतर सोमवारी रात्रीच गुजरातमध्ये गेले.

याच दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीकडे रवाना झाले आहेत. या सगळ्या गोंधळादरम्यान देवेंद्र फडणवीसांच्या तातडीच्या दिल्लीवारीमुळे आता राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा गोंधळ सुरू झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या