Sunday, November 17, 2024
Homeब्रेकिंग न्यूजमी तुम्हाला मुख्यमंत्री बनवतो परंतु…; फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

मी तुम्हाला मुख्यमंत्री बनवतो परंतु…; फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

नाशिक | Nashik
नाशिक लोकसभा आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघासाठी महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि डॉ. भारती पवार यांनी आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, मंत्री छगन भुजबळ, शिवसेना नेते संजय शिरसाट उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी प्रचाराला कमी अवधी असल्याच्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरेंवर निशाणा साधताना महायुतीच्या पदाधिकार्‍यांसारखे घरी बसून, फेसबुक लाईव्ह करुन आम्ही काम करत नाही, लोकांच्या मदतीला धावून जाणारे, फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन काम न करणारे, निवडणुका असू द्या नसु द्या आमचे सैनिक सतत काम करणारे असल्याने प्रचाराच्या या छोट्या कालावधीतही मोंठी यंत्रणा सक्षमपणे काम करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे विजय आमचा पक्का असल्याचा दावा त्यांनी केला.

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस जे बोलले ती वस्तुस्थिती
जेव्हा आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो तेव्हा त्यांनी प्रयत्न केले, मला ही केले की तुम्ही पुन्हा या मी तुम्हाला मुख्यमंत्री बनवतो परंतु मी मुख्यमंत्री बनण्यासाठी हा निर्णय घेतला नव्हता, बाळासाहेबांच्या विचारांना मुठमाती दिली गेली. त्यावेळी वैचारिक भुमिका घेऊन आम्ही गेलो. त्यामुळे त्यांनी मला ही निरोप दिला आणि दिल्लीला देखील निरोप पाठवण्यात आला, की यांना कशाला घेता आम्ही सगळेच येतो. पण त्यांच्याकडे शिवसेना राहिलीच नव्हती. माझ्यासोबत ५० लोकं होते. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे बोलले ति वस्तुस्थिती आहे आणखी खुप काही आहे जे मी बोलू शकत नाही. अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?
उद्धव ठाकरेंचा मला सकाळी फोन आला. तेव्हा त्यांनी बंडखोरांना का सोबत घेताय, असा प्रश्न केला. शिंदेंना एखादे पद तुम्ही का देताय, असा सवालही त्यांनी केला. संपूर्ण शिवसेना पक्ष तुमच्यासोबत घेऊन येतो, अशी ऑफर तेव्हा ठाकरेंनी दिली होती. उद्धव ठाकरेंनी मला मुख्यमंत्रीपदाची ऑफरही दिली. मिलिंद नार्वेकरांनी मला फोन लावला, मग उद्धव ठाकरे बोलले. पण मी उद्धव ठाकरेंना सांगितले वेळ निघून गेली आहे. या निर्णयाशी वरिष्ठांशी बोला, असा सल्ला मी त्यांना दिला. माझ्या पातळीवर हा निर्णय संपल्याचे मी ठाकरेंना सांगितले. जे सोबत आले त्यांच्याशी बेईमानी करणार नाही, असे मी त्यांना स्पष्ट सांगितले होते, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या