Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूज"आमची युती फार…"; एकनाथ शिंदेंचे रविंद्र चव्हाणांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर

“आमची युती फार…”; एकनाथ शिंदेंचे रविंद्र चव्हाणांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर

इगतपुरी | Igatpuri
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील महायुतीचा वाद एवढा विकोपाला गेला आहे की, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मला फक्त 2 डिसेंबरपर्यंत युती टिकवायची आहे, असे निर्वाणीचे वक्तव्य गुरुवारी केले. त्यावरुन या निवडणुकीनंतर महायुती तुटणार का, अशी चर्चा राज्यात रंगली आहे. त्यावर उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

निलेश आणि नितेश राणे हे दोन्ही बंधू वेगवेगळ्या पक्षात आहेत. त्यांच्यामधून सध्या विस्तव जात नाही अशी स्थिती या निवडणुकीत निर्माण झाली आहे. त्यातूनच रविंद्र चव्हाणांनी आम्हाला 2 डिसेंबरपर्यंत युती टिकवायची आहे, असे विधान केले. त्यांच्या या विधानामुळे 2 डिसेंबरनंतर युतीचे काय होणार, अशी चर्चा रंगली आहे. त्यातच आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता रविंद्र चव्हाण यांच्या विधानावर प्रत्युत्तर दिले आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इगतपुरी, नाशिक येथे आले होते. यावेळी माध्यमांशी बोलत असताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, रविंद्र चव्हाण यांचे विधान यावर प्रतिक्रिया दिली.

- Advertisement -

आमची युती फार पूर्वीच
रविंद्र चव्हाण यांच्या विधानावर बोलताना शिंदे म्हणाले, “आमची युती फार पूर्वीच स्व. बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी साहेबांनी केली होती. ही युती विचारधारेवर झालेली होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार कार्यरत आहे. आमची युती फार पूर्वीपासून एका विचारावर काम करत आहे. ही युती कायम राहिल.”

YouTube video player

दरम्यान रविंद्र चव्हाण यांच्या विधानाबद्दल शिवसेनेचे (ठाकरे) नेते उद्धव ठाकरे यांनाही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “याचा अर्थ वापरा आणि फेकून द्या असाच होतो. त्यांना युज अँड थ्रो असे म्हणायचे असेल. आता हा थ्रो किती लांबपर्यंत जातोय, हे पाहूया.”

भाजपकडून सारवासारव
मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, महायुतीत निवडणूक लढवण्याचे आमचे प्रयत्न होते, मात्र परिस्थितीनुसार विविध ठिकाणी आम्ही एकमेकांच्या विरोधात लढत आहोत. त्यामुळे आमच्याच दोन नेत्यांमध्ये भांडणे लागत आहेत. ही भांडणे करु नका, दोन डिसेंबरपर्यंत भांडू नका, असे त्यांना म्हणायचे असेल. त्यांचा म्हणायचा अर्थ वेगळा होता. सध्या जी टीका टिपण्णी सुरु आहे, काही मतदारसंघांमध्ये टोकाचे वाद चालू आहेत, त्यामुळे ते तसे बोलले असतील, असे गिरीश महाजन म्हणाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Nashik News : पाणी व स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन रखडले;...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ व जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषद (Zilla Parishad) स्तरावर कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर...