Tuesday, October 20, 2026
Homeब्रेकिंग न्यूजएकनाथ शिंदेंनी भाजपकडून ५०० कोटी घेतल्याचा जरांगेंचा दावा...; शिंदे सेनेकडून पहिली प्रतिक्रिया...

एकनाथ शिंदेंनी भाजपकडून ५०० कोटी घेतल्याचा जरांगेंचा दावा…; शिंदे सेनेकडून पहिली प्रतिक्रिया समोर, ज्याच्यात हिम्मत असेल तो बोलेल…

मुंबई | Mumbai
बीडच्या नारायण गडावर आज मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांचा दसरा मेळावा पार पडला. दसऱ्या मेळाव्यातील या भाषणातून मनोज जरांगे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. विशेष म्हणजे मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर हल्लाबोल केला. एकनाथ शिंदेसाहेब, तुम्ही भाजपकडून 500 कोटी रुपये आणले आणि श्रीकांत शिंदेंकडून मला दिले असं भाजप नेत्यांना सांगितलं का? याचं उत्तर तुम्ही आज किंवा उद्या संध्याकाळपर्यंत द्या, असं आव्हान देखील मनोज जरांगे यांनी दिलं. या दाव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. जरांगे यांच्या या आरोपांवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षातून पहिली प्रतिक्रिया आली आहे. माजी मंत्री रामदास कदम यांनी यावर भाष्य केलंय.

हे मतभेद कशासाठी हवे आहेत
रामदास कदम यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी मनोज जरांगे यांच्या आरोपांवर भाष्य केले. “भाजपा शिवसेनेला संपवते आहे की शिवसेना भाजपाला संपवत आहे, हे असे मतभेद कशासाठी हवे आहेत. एकनाथ शिंदे यांनी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील मराठा समाजाला मदत केलेली आहे,” असे विधान रामदास कदम यांनी केले. तसेच माझी आपणाला विनंती आहे की, आपण मराठा समाजाचे आहात. कुठे काय कुजबूज होते आहे याकडे लक्ष देऊ नका. ज्याच्यात हिम्मत असेल तो बोलेल, त्यानंतर मग त्याला उत्तर द्या, असे आवाहनही कदम यांनी जरांगेंना केले.

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालय भ्रष्ट पंतप्रधानांना…; संजय राऊतांच्या पोस्टने खळबळ, म्हणाले, घटनांपासून धडा घेतला

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस मराठा समाजाला मदद करत आहेत. आम्ही भाजपसोबत युती केली. शिवसेनाप्रमुखांचे ते स्वप्न होते. शिंदे यांनी बंड केले तेव्हा त्यांच्यासोबत 40 आमदार होते, आता 65 आमदार आहेत. एकनाथ शिंदे खंबीर आहेत. आपल्याला संपवण्याचे प्रयत्न केले तर आपण राजकारणात नवीन आहात का? असा सवालही कदम यांनी जरांगे यांना केला.

भाजप शिवसेनेत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न
जरांगे यांनी मनात काही ठेवले नाही. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. भाजप-शिवसेनेत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. कोणावर किती विश्वास ठेवायचा मनोज जरांगे बघतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

ताज्या बातम्या

Nashik Simhastha News : कुशावर्त परिसरातील ध्वजारोहण सोहळ्याच्या तयारीला अधिक गती...

0
नाशिक | Nashik सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbhmela) ध्वजारोहण सोहळ्याच्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथील कुशावर्त तीर्थ परिसरात सुरू असलेली विकासकामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त...