Wednesday, October 21, 2026
Homeब्रेकिंग न्यूजसर्वोच्च न्यायालय भ्रष्ट पंतप्रधानांना...; संजय राऊतांच्या पोस्टने खळबळ, म्हणाले, घटनांपासून धडा घेतला

सर्वोच्च न्यायालय भ्रष्ट पंतप्रधानांना…; संजय राऊतांच्या पोस्टने खळबळ, म्हणाले, घटनांपासून धडा घेतला

मुंबई | Mumbai
शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अल्बेनियात सरकारविरुद्ध सुरू असलेल्या हिंसक आंदोलनाचा उल्लेख करत भारतालाही यातून शिकण्याचा सल्ला दिला आहे. संजय राऊत यांनी सोशल मीडिया एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अल्बेनियात लोक भ्रष्टाचाराच्या आरोपांनी वेढलेल्या पंतप्रधानांना न्यायपालिकेकडून मदत मिळत असल्याने नाराज आहेत. याच रागाच्या भरात आंदोलकांनी सरकारी संस्थांना लक्ष्य केले. राऊत म्हणाले की, सर्व देशांनी या घटनांमधून धडा घेतला पाहिजे, विशेषतः भारताने. या पोस्टसोबत संजय राऊतांनी तिथला एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे, ज्यात अल्बेनियाच्या सुप्रीम कोर्टाला आग लागल्याचे दिसत आहे.

Mohan Bhagawat: पश्चिमेकडून एक ‘वादळ’ उठले आहे, त्याबाबत सावध राहणे आवश्यक…देशातील आंदोलनावर मोहन भागवतांचं भाष्य

- Advertisement -

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अल्बेनियातील घटनांचा उल्लेख करत भारतालाही यातून धडा घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी म्हटले की, “अल्बानियात लोकांनी सर्वोच्च न्यायालय जाळून टाकले. सर्वोच्च न्यायालय भ्रष्ट पंतप्रधानांना मदत करत असल्याने लोक भडकले होते. आंदोलक जनतेने संसद आणि सरकारी कार्यालयांवर, मंत्र्यांच्या घरांवर देखील हल्ले केले आहेत. सर्व देशांनी या घटनांपासून धडा घेतला पाहिजे.”

अल्बानियात लोकांनी सर्वोच्च न्यायालय जाळून टाकले. सर्वोच्च न्यायालय भ्रष्ट पंतप्रधानांना मदत करत असल्याने लोक भडकले होते. आंदोलक जनतेने संसद आणि सरकारी कार्यालयांवर,मंत्र्यांच्या घरांवर देखील हल्ले केले आहेत. सर्व देशांनी या घटनांपासून धडा घेतला पाहिजे. विशेषतः 🇮🇳 https://t.co/3JSMJCMjXA— Sanjay Raut (@rautsanjay61) October 19, 2026

सर्वोच्च न्यायालयाची संजय राऊतांना नोटीस
काही दिवसांपूर्वीच भारताच्या सुप्रीम कोर्टाने मुख्य न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायपालिकेबाबत सार्वजनिकरीत्या केलेल्या टिप्पण्यांबाबत संजय राऊत यांना कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. मुख्य न्यायाधीश आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने मात्र राज्यसभा सदस्य राऊत यांना पुढील सुनावणीत वैयक्तिकरित्या उपस्थित राहण्यापासून सूट दिली. खंडपीठाने म्हटले की, ते आधी त्यांच्या उत्तरावर विचार करतील.

ताज्या बातम्या