Tuesday, January 27, 2026
Homeब्रेकिंग न्यूजDCM Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; भाजप वरिष्ठांची भेट घेणार,...

DCM Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; भाजप वरिष्ठांची भेट घेणार, की महायुतीतील कुरबुरी, आगामी निवडणुका?नेमकं कारण काय?

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले सर्व पूर्वनियोजित कार्यक्रम तडकाफडकी रद्द करत अचानक दिल्लीकडे धाव घेतली आहे. हा दौरा पूर्वनियोजित नसतानाही, ते दिल्लीमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत. ठाण्यासह राज्यातील काही ठिकाणी शिंदे सेना आणि भाजपमधील कुरबुरी वाढल्या आहेत. तर शिंदेसेनेच्या आमदारांना निधी देण्यावरूनही नाराजी नाट्य आहे. त्यामुळे या दिल्ली दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

अचानक होत असलेल्या या दिल्ली दौऱ्यामुळं एकनाथ शिंदे नाराज आहेत की आगामी महापालिका निवडणुकीची रणनिती आखण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहे अशी चर्चा सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे राज्याच्या राजकारणातील महत्त्वाच्या घडामोडींवर, विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकांच्या निवडणुकीतील जागावाटपावर चर्चा करण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

शनिवारी मध्यरात्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत दाखल झाले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या बंगल्यावरून शिंदे आज दिल्लीत वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेणार असल्याचे समजत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ते भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर आज सकाळी शिंदे हे मोदींच्या भेटीला निघाल्याचे समोर आले आहे. या भेटीत ते राज्यातील कोणत्या विषयावर चर्चा करतात याची माहिती लवकरच समोर येईल.

YouTube video player

शिंदे यांच्या दिल्ली भेटीला महत्त्वाचे कारण मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांतील जागावाटपाचा विषय असू शकतो. भाजपकडून मुंबईत ‘मिशन १५०’ अंतर्गत १५० पेक्षा जास्त जागा लढवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. दुसरीकडे, शिंदे यांच्या शिवसेनेने किमान १०० जागा तरी मिळाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. भाजपने जर १५० जागा लढवल्या, तर २२७ जागांपैकी शिंदे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला किती जागा येतील, याबद्दल राजकीय तिढा निर्माण झाला आहे. याच जागावाटपाच्या मुद्द्यावर कैफियत मांडण्यासाठी शिंदे दिल्लीत गेले असावेत, अशी चर्चा आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Jalgaon News : धक्कादायक! माथेफिरूने दोन शाळकरी मुलींना विहिरीत ढकलले; दोघींचाही...

0
जळगाव । Jalgoan जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. साकरी गावाजवळ एका माथेफिरूने इयत्ता ९ वीत शिकणाऱ्या दोन...