Sunday, May 19, 2024
Homeमुख्य बातम्या"हे सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही"; अवकाळी आणि गारपीटीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांचे उत्तर

“हे सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही”; अवकाळी आणि गारपीटीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांचे उत्तर

मुंबई | Mumbai

गेल्या दोन दिवसात राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली असून काही ठिकाणी गारपीटदेखील झाली. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हा मुद्दा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत उपस्थित केला. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांना उत्तर दिले आहे…

- Advertisement -

काय म्हणाले अजित पवार?

राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पावसाचा अलर्टदेखील जारी करण्यात आला आहे. हे गांभीर्याने घेण्याची गरज असून शेतकऱ्यांना मदत करायला हवी. झालेली मदत तुटपुंजी आहे.

अमृता फडणवीसांना १ कोटी लाचेची ऑफर देणारी ‘अनिक्षा’ कोण?

गेल्या आठ दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण आहे. अवकाळी पावसाने पीकांचे नुकसान होत आहे. आंबे, संत्री, काजू, पपई, पालेभाज्यांचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकार संवेदनशील आहे की नाही कळायला मार्ग नाही. आम्हीही शेतकऱ्यांचे प्रतिनिधीत्व करतो. शेती आमचा मूळ व्यवसाय असल्याचे सांगत अजित पवार यांनी अवकाळी पाऊस आणि गारपीटीने झालेल्या नुकसानीकडे सरकारचे लक्ष वेधले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

छत्रपती संभाजीनगरमध्ये ईडीची छापेमारी; ९ ठिकाणी कारवाई

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

अवकाळी पावसाचा मुद्दा विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केला. याबाबत मी नांदेड, नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे. ते प्रत्यक्ष जाऊन पंचनामे करत आहेत. अहवाल लवकरच येतील. शेतकऱ्यांच्या मागे आम्ही उभे राहणारच आहोत. नियम, निकष डावलून मदत केली आहे आणि आजदेखील मदत करत आहोत. शेतकऱ्यांना हे सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या