Thursday, June 11, 2026
Homeक्राईमNashik Crime News: "ही राष्ट्रीय सुरक्षेची गोपनीय तपासणी, जर कोणाला"…; डिजिटल अरेस्टच्या...

Nashik Crime News: “ही राष्ट्रीय सुरक्षेची गोपनीय तपासणी, जर कोणाला”…; डिजिटल अरेस्टच्या नावाखाली वृध्दाला पावणे दोन लाखांना लुटलं

नाशिक | प्रतिनिधी
तुमच्याच घरात, तुमच्याच कुटुंबासोबत असताना तुम्ही कैदी असू शकता का ? ऐकायला विचित्र वाटेल, पण नाशिकच्या इंदिरानगर भागात एका ६२ वर्षीय वृद्धासोबत हा थरार तब्बल २१ दिवस सुरू होता. सायबर चोरट्यांनी डिजिटल अरेस्टच्या नावाखाली या वृद्धाला मोबाईल स्क्रीनवर २४ तास वाँचवर ठेवून तब्बल एक कोटी ५९ लाख ८२ हजार रुपयांना लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

ही राष्ट्रीय सुरक्षेची गोपनीय तपासणी आहे, जर कोणाला सांगितले तर…
फिर्यादी हे एका खासगी कंपनीतून निवृत्त झाले आहेत. ४ एप्रिल रोजी त्यांना एक कॉल आला. “तुमच्या आधार कार्डवरून बेनामी व्यवहार झाले असून तुमचे नाव मनी लाँड्रिंग आणि टेरर फंडिंगमध्ये आले आहे,” असे सांगून त्यांचे जगच थांबवण्यात आले. समोरून बोलणारे व्यक्ती मुंबई पोलीस, एटीएस आणि सीबीआयचे बड़े अधिकारी असल्याचे भासवत होते. विश्वास बसवावा म्हणून संशयितांनी खाकी वर्दीत व्हिडिओ कॉल केला. इतकेच नव्हे, तर त्यांच्या मागे सर्वोच्च न्यायालय आणि ईडी, सीबीआय, एटीएस या यंत्रणांचे बनावट लोगो व कार्यालये दाखविण्यात आली. “ही राष्ट्रीय सुरक्षेची गोपनीय तपासणी आहे, जर कोणाला सांगितले तर तुमच्या मुला-मुलीवरही कारवाई होईल,” अशी धमकी संशयितांनी दिली. यामुळे पीडित वृद्ध २१ दिवस स्वतःच्या घरात आपल्या मुलांशी एक शब्दही बोलू शकले नाहीत.

- Advertisement -

Suvendu Adhikari PA Shot Dead: सुवेंदू अधिकारींच्या पी.ए ची गोळ्या झाडून हत्या, कट रचून मारल्याचा आरोप

मोबाईलचा कॅमेरा सतत सुरू ठेवून डिजिटल हाऊस अरेस्टमध्ये ठेवलं
मोबाईलचा कॅमेरा सतत सुरू ठेवून त्यांना डिजिटल हाऊस अरेस्टमध्ये ठेवण्यात आले. खाकी वर्दीतील बनावट साहेबांच्या आदेशानुसार ते उठत बसत होते. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे तपास करत आहेत. या टोळीचे धागेदोरे नाशिक, मुंबईसह थेट मेरठ, नोएडा आणि मध्य प्रदेशपर्यंत असल्याची शक्यता आहे. तांत्रिक तपासाद्वारे या हायटेक दरोडेखोरांचा शोध घेतला जात आहे.

आयुष्यभराची पुंजी साफ
तपासाच्या नावाखाली आणि अटकेची भीती दाखवून संशयितांनी वृद्धाला त्यांच्या सेवानिवृत्तीचे सर्व पैसे वेगवेगळ्या बँक खात्यांत जमा करायला लावले. इतकेच नाही तर, त्यांच्या मुलीच्या बँक खात्यातूनही मोठी रक्कम वर्ग करण्यात आली. २१ एप्रिलपर्यंत हा खेळ सुरू होता. अखेर संशयितांचे फोन बंद झाल्यावर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

डिजिटल अरेस्ट म्हणजे काय ?
पोलीस किंवा कोणतीही सरकारी यंत्रणा तुम्हाला व्हॉट्सॲप किंवा व्हिडिओ कॉलवर अरेस्ट करत नाही. जर कोणी तुम्हाला व्हिडिओ कॉलवर नजरकैदेत ठेवत असेल किंवा केस मिटवण्यासाठी पैशांची मागणी करत असेल, तर तो १०० टक्के सायबर गुन्हा आहे. अशा वेळी त्वरित १९३० वर संपर्क साधावा, असे आवाहन संजय पिसे यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

Crime News : जुगाराच्या बहाण्याने रोख रक्कम व ऑनलाइन पैसे उकळले

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar नेप्ती टोलनाका परिसरात ट्रक चालकाला जुगाराच्या बहाण्याने धमकावून 55 हजार रूपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चार अज्ञात इसमांविरोधात कोतवाली...