Sunday, September 8, 2024
Homeब्रेकिंग न्यूजशरद पवार गटाला दिलासा; निवडणुक आयोगाने 'चिन्हाबाबत' घेतला मोठा निर्णय

शरद पवार गटाला दिलासा; निवडणुक आयोगाने ‘चिन्हाबाबत’ घेतला मोठा निर्णय

मुंबई | Mumbai
लोकसभा निवडणुकीदरम्यान शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पिपाणी या चिन्हामुळे चांगलाच फटका बसला होता. तुतारी आणि पिपाणी या एकसारख्या दिसणाऱ्या चिन्हामुळे नाशिकच्या दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे उमेदवार भास्कर भगरे यांना याचा फटका बसला होता. याबाबत शरद पवार गटाने निवडणुक आयोगाकडे लेखी तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीमध्ये त्यांनी पिपाणी चिन्हामुळे आम्हाला निवडणुकीमध्ये आम्हाला फटका बसल्याची भावना व्यक्त करत हे चिन्ह रद्द करण्यात यावे अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यांच्या या मागणीनंतर निवडणूक आयोगाने अपक्ष उमेदवारांच्या चिन्हांमधून पिपाणी हे चिन्ह गोठवले आहे.

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीमध्ये नाशिकच्या दिंडोरी मतदारसंघात मविआचे उमेदवार भास्कर भगरे यांच्याविरोधात अपक्ष उमेदवार बाबू भगरे उभे होते. बाबू भगरे यांना पिपाणी चिन्ह मिळाले होते. तिसरी पास असणाऱ्या बाबू भगरेंना १ लाखांवर मते मिळाली होती. केवळ या चिन्हामुळे त्यांना ही मते मिळाली होती. त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर आता राज्य निवडणुक आयोगाने पिपाणी चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच, सातारा लोकसभा मतदार संघात पिपाणी चिन्हाला ३७ हजार मतं मिळाली होती. या मतदारसंघात शरद पवार गटाच्या उमेदवाराचा ३२ हजार मतांनी पराभव झाला होता. बीडमध्ये पिपाणीला ५ लाख ४० हजार ८५० मते मिळाली होती. अशात काही महिन्यांवर येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत फटका बसू नये यासाठी शरद पवार यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती. याची दखल घेत निवडणूक आयोगाने पिपाणी चिन्ह गोठवले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या