Thursday, September 19, 2024
Homeब्रेकिंग न्यूजElection Commission : निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद, विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजणार?

Election Commission : निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद, विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजणार?

दिल्ली । Delhi

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीनंतर (Loksabha Election) आता विधानसभा निवडणुकीचे (Assembly Election 2024) वारे वाहू लागले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून (Election Commission Of India) विधानसभा निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकते.

या पार्श्वभूमीवरच केंद्रीय निवडणूक आयोग आज विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्याची शक्यता आहे. आज दुपारी ३ वाजता निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार असून यावेळी विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.

हे हि वाचा : मविआचं ठरलं! उद्धव ठाकरेंना मिळणार मोठी जबाबदारी, काँग्रेस हायकमांडकडून ग्रीन सिग्नल

केंद्रीय निवडणूक आयोग आज विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करणार असल्याच्या यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने एक ट्विट केलं आहे. पण यामध्ये नेमकी कोणत्या राज्याच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जातात हे स्पष्ट करण्यात आलेलं नाही. मात्र, जम्मू-कश्मीर, झारखंड, हरियाणा या राज्यांबाबत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचीही घोषणाही होणार का? याकडे आता महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे.

हे हि वाचा : बारामतीमधून जय पवार विधानसभेच्या रिंगणात? अजित पवारांकडून संकेत

- Advertisment -

ताज्या बातम्या