Wednesday, March 26, 2025
Homeक्राईमनिवडणुकीच्या जल्लोषा दरम्यान पाच तोळे लंपास

निवडणुकीच्या जल्लोषा दरम्यान पाच तोळे लंपास

वखार महामंडळ परिसरातील घटना

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जल्लोष करणार्‍या एका कार्यकर्त्याच्या गळ्यातील 90 हजार रुपये किमतीच्या दोन चेन एकाने चोरल्या. वखार महामंडळ गोडाऊनच्या परिसरात ही घटना घडली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरी करणार्‍या संशयिताला अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

सचिन मोहन शिंदे (रा. सप्रे मळा, बोल्हेगाव फाटा) यांनी फिर्याद दिली आहे. राजेंद्र वसंत शिंदे (रा. पाथर्डी) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी सांगितले. मंगळवारी मतमोजणीनंतर कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला जात होता. त्यादरम्यान शिंदे यांच्या गळ्यातील अडीच तोळ्याची डीझाईनची चेन व सव्वा दोन तोळ्याची पॅन्डल असलेली चेन अशा पावणे पाच तोळ्याचा ऐवज चोरला. सदरचा प्रकार त्याठिकाणी असलेल्या दुसर्‍या व्यक्तीच्या लक्षात आला व त्यांनी चोरी करणार्‍याला पकडले. त्याचे नाव राजेंद्र शिंदे असल्याचे समोर आले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Vidhan Sabha Deputy Speaker: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे विधानसभेचे नवे...

0
मुंबई | Mumbaiराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभेच्या उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाली आहे. विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी केवळ महायुतीच्यावतीने बनसोडे यांचा अर्ज...