Saturday, May 18, 2024
Homeनंदुरबारनंदुरबार जिल्हयातील सहाही पंचायत समित्यांच्या सभापती, उपसभापतींची निवड

नंदुरबार जिल्हयातील सहाही पंचायत समित्यांच्या सभापती, उपसभापतींची निवड

नंदुरबार Nandurbar । प्रतिनिधी

जिल्हयातील नंदुरबार, शहादा, नवापूर,(Nandurbar, Shahada, Navapur,) तळोदा, अक्कलकुवा व अक्राणी या पंचायत समितीच्या (Panchayat Samiti) सभापती, उपसभपतींची (Chairman, Deputy Chairman) आज निवड (selection) करण्यात आली. या सहापैकी तीन पंचाायत समित्यांवर काँग्रेस (Congress on three Panchayat Committees,) दोन पंचायत समित्यांवर शिवसेना शिंदे गट (Shiv Sena Shinde group on two panchayat committees) तर एका पंचायत समितीवर भाजपाने (BJP dominates one Panchayat Samiti) वर्चस्व सिद्ध केले आहे. जिल्हयातील शहादा व नंदुरबार पंचायत समितीत सत्तांतर घडले आहे. तर तळोदा येथे भाजपा-काँग्रेसची युती होती. पहिल्या अडीच वर्षात भाजपाला तर आता काँग्रेसला संधी देण्यात आली.

- Advertisement -

नंदुरबार जिल्हयातील नंदुरबार, शहादा, नवापूर, तळोदा, अक्कलकुवा व अक्राणी पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती निवडीसाठी आज सहाही पंचायत समित्यांच्या सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यात नंदुरबार पंचायत समिती पहिल्या अडीच वर्षात भाजपाच्या ताब्यात होती. मात्र, आता या पंचायत समितीवर शिवसेनेच्या शिंदे गटाने सत्ता स्थापन केली आहे.

शहादा पंचायत समितीत 28 पैकी काँग्रेसचे 14 व राष्ट्रवादीचा एक असे 15 सदस्य गैरहजर राहिल्याने भाजपाचे वीरसिंग हरसिंग ठाकरे तर उपसभापतीपदी भाजपच्या कल्पना श्रीराम पाटील यांची निवड झाली आहे. काँग्रेसकडे पुरेसे संख्याबळ असूनही भाजपने पंचायत समितीवर सत्ता काबीज केली. नवापूर येथील पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्या बबीता नरेंद्र गावित तर उपसभापतीपदी शिवाजी पायल्या गावित हे विजयी झाले आहेत.

तळोदा येथील पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडणूकीत काँग्रेसच्या लताबाई अर्जून वळवी या भाजपाच्या पाठींबावर सभापतीपदी विराजमान झाल्यात. तर उपसभापतीपदी भाजपाचे विजयसिंग चतुरसिंग राणा यांची बिनविरोध निवड झाली आहे.

अक्कलकुवा पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीच्या निवडीत काँग्रेस पक्षाने आपले वर्चस्व अबाधित राखले असून सभापतीपदी नानसिंग वळवी यांची तर उपसभापती पदी मेलदीबाई वळवी यांची निवड झाली आहे.

धडगाव पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या शिंदे गटाने वर्चस्व राखले. सभापतीपदी हिराबाई रवींद्र पराडके तर उपासभापती पदी भाईदास अत्रे यांची बिनविरोध फेरनिवड झाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या