Monday, July 8, 2024
Homeराजकीयविधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; ‘या’ दिवशी मतदान आणि मतमोजणी

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; ‘या’ दिवशी मतदान आणि मतमोजणी

मुंबई । Mumbai

- Advertisement -

महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ जागा रिक्त होत असून, त्यासाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. विधानसभा सदस्य विधान परिषदेतील आमदारांची निवड करणार आहेत.

२५ जून पासून २ जुलैपर्यंत अर्ज भरण्याची मुदत असणार आहे. ५ जुलै रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असेल. १२ जुलै रोजी रोजी मतदान होणार आहे. सकाळी ९ ते संध्याकाळी चार या वेळेत मतदान पार पडणार आहे. १२ जुलै रोजीच होणार पाच वाजल्यानंतर मतमोजणी सुरुवात होईल.

२७ जुलै रोजी कार्यकाळ संपणाऱ्या आमदारांमध्ये विजय गिरकर, निलय नाईक, रमेश पाटील, रामराव पाटील (भाजप), महादेव जानकर (भाजप मित्र पक्ष), अनिल परब (शिवसेना ठाकरे गट), मनीषा कायंदे (शिवसेना शिंदे गट), डॉ. वजाहत मिर्झा व डॉ. प्रज्ञा सातव (काँग्रेस), बाबाजानी दुराणी (राष्ट्रवादी), जयंत पाटील (शेकाप) या 11 आमदारांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या