Monday, September 28, 2026
Homeब्रेकिंग न्यूज१० राज्यातील २४ राज्यसभा जागांसाठी निवडणुक कार्यक्रम जाहीर; खरगे, दिग्विजय सिंह यांसह...

१० राज्यातील २४ राज्यसभा जागांसाठी निवडणुक कार्यक्रम जाहीर; खरगे, दिग्विजय सिंह यांसह बड्या नेत्यांचा कार्यकाळ संपणार

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
निवडणूक आयोगाने १० राज्यांमधील २४ राज्यसभा जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणुक कार्यक्रम जाहीर केला. २४ जागांसाठी १८ जून रोजी निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ८ जून असणार आहे. या जागांवरील विद्यमान सदस्य २१ जून ते १९ जुलै दरम्यान निवृत्त होत आहेत. निवडणुक आयोगाच्या घोषणेनंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे.

हे बडे नेते निवृत्त होणार
निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्यासह २४ खासदारांचा समावेश आहे. राजस्थानमधून राजेंद्र गेहलोत, नीरज डांगी आणि रवनीत सिंह बिट्टू यांच्या जागा रिकाम्या होत आहेत. या नेत्यांच्या जागी आता भाजप आणि काँग्रेस कोणाला संधी देणार, तसेच संख्याबळानुसार कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

Prasad Lat Meets Manoj Jarange Patil: ओबीसी आरक्षणाला नेमका कोणता निकष लावला? गरीब म्हणून निकष लावला का? मनोज जरांगेंचा प्रसाद लाडांवर प्रश्नांचा भडीमार

कोणत्या राज्यात किती जागांसाठी निवडणुक?
आंध्र प्रदेश – ४ जागा
गुजरात – ४ जागा
कर्नाटक – ४ जागा
मध्य प्रदेश – ३ जागा
राजस्थान – ३ जागा
झारखंड – २ जागा
मणीपुर – १ जागा
मेघालय – १ जागा
अरुणाचल प्रदेश – १ जागा
मिझोरम – १ जागा

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या जनरलच्या 7 जागा बिनविरोध होण्याची शक्यता

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद होत असताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मात्र राजकीय वातावरण तापण्याआधीच समझोत्याचे सूर उमटू लागले आहेत. रविवारी संगमनेर...