Saturday, May 4, 2024
Homeदेश विदेशइलेक्ट्रिक बाइकच्या शोरूमला भीषण आग; ८ जणांचा होरपळून मृत्यू

इलेक्ट्रिक बाइकच्या शोरूमला भीषण आग; ८ जणांचा होरपळून मृत्यू

सिकंदराबाद | Sikandrabad

सिकंदराबादमध्ये इलेक्ट्रिक बाइकच्या शोरूमला आग (Fire) लागल्याची घटना आहे. काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले आणि यात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १३ जण जखमी झाले आहेत. शोरूममध्ये आणखी लोक अडकले होते. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.

- Advertisement -

शॉर्ट सर्किट (short circuit) झाल्यामुळे इलेक्ट्रिक बाइकच्या शोरूमला आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. ही आग शोरूमच्या वर असलेल्या हॉटेलमध्येही पसरली. यात सुमारे ८ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. १३ जण जखमी झाले आहे.

आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे (Fire Brigade) बंब घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्याचे काम सुरु केले. जखमींना तत्काळ उपचारासाठी रुग्णांलयात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या