Wednesday, January 7, 2026
HomeनगरJamkhed : विजेच्या तारांना चिकटून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू

Jamkhed : विजेच्या तारांना चिकटून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

क्रिकेट खेळताना घराच्या स्लॅबवर गेलेला चेंडू फ्लेक्सच्या लोखंडी पाईपने काढत असताना वीजेच्या मुख्य वाहिनीचा शॉक लागून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही घटना जामखेड शहरातील खर्डा चौक येथील टेकाळेनगर या ठिकाणी घडली. वीजेच्या तारांना चिकटून मृत्यू झालेली ही आठ दिवसांतील दुसरी घटना आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी, जामखेड शहरातील खर्डा चौकातील टेकाळे नगर या ठिकाणी सोमवार (दि. 30) रोजी सायंकाळी साडेपाच वाजता प्रणव प्रशांत टेकाळे (वय 12,रा. टेकाळेनगर) हा मित्रांसोबत घराजवळ क्रिकेट खेळत होता. प्रणव टेकाळे याच्या घराजवळून महावितरण मुख्य विद्युत वाहिनी गेलेली आहे. क्रिकेट खेळत असताना मुलांचा चेंडू घराच्या स्लॅबवर गेला. याच घराजवळून विजेची मुख्य वाहिनी गेली होती.

YouTube video player

यावेळी प्रणव हा फ्लेक्सचा लोखंडी पाईपने चेंडू काढण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या हातातील लोखंडी पाईपाचा मुख्य लाईनच्या तारांना स्पर्श झाला आणि विजेचा जोरदार धक्का प्रणव याला बसला, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याठिकाणी असलेल्या प्रणव याच्या चुलत्यांनी आणि नातेवाईकांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले, मात्र त्याचा जीव आधीच गेलेला होता. जामखेड पोलिस ठाण्यात याची खबर मयूर टेकाळे यांनी दिली असून अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मागील आठ दिवसांपूर्वीच जामखेड तालुक्यातील बाळगव्हाण येथील उसाच्या शेतात खत टाकण्यासाठी गेलेल्या बाप-लेकाचा शेतातील खाली पडलेल्या विजेच्या तारांना चिकटून जागेवरच मृत्यू झाला होता. विद्युत महामंडळाच्या गलथान कारभारामुळे या दोघांचा मृत्यू झाला असल्याचे समजते. यानंतर खर्डा- बाळगव्हाण येथील वायरमन यांना दोषी धरत मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची जामखेड तालुक्यातील येत्या आठ दिवसांतील ही दुसरी घटना आहे. 

ताज्या बातम्या

अपघाताचा बनाव उघड, तपासात खून असल्याचे स्पष्ट

0
त्र्यंबकेश्वर | वार्ताहर Trimbakeshwar जुन्या अपघाताच्या गुन्ह्याचा तपास करताना तो अपघात नसून खून असल्याचे निष्पन्न झाल्याने सराईत आरोपीस अटक करण्यात आली आहे. त्रंबकेश्वर...