Thursday, February 5, 2026
HomeनगरJamkhed : वीजेच्या तारांना चिटकून बाप लेकाचा मृत्यू

Jamkhed : वीजेच्या तारांना चिटकून बाप लेकाचा मृत्यू

जामखेड तालुक्यातील घटना

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

जामखेड तालुक्यातील शिकारे वस्ती येथील बाळगव्हाण ग्रामपंचायतचे सदस्य काकासाहेब दौलत शिकारे (वय 42) व त्यांचा मुलगा गणेश काकासाहेब शिकारे (वय 15) शेतामध्ये खते टाकण्यासाठी गेले होते. यावेळी त्या ठिकाणी आधीच तुटलेल्या तारांमधील वीजेचा करंट बसून या दोघांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवार (दि. 23) रोजी संध्याकाळी घडली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

संध्याकाळी हे बापलेक घरी परतले नाहीत, म्हणून कुटुंबातील काही सदस्य व काही ग्रामस्थांनी शोधा शोध केली असता त्यांचा शेतामध्ये मृतदेह विजेच्या तुटलेल्या तारे जवळ दिसून आला. 15 ते 20 दिवसांपूर्वी वादळी वार्‍यात शिकारे यांच्या शेतात महामंडळाच्या खांबावरील तारा तुटल्या होत्या. याबाबत नागरिकांनी महावितरणच्या अधिकार्‍यांना कळले होते. परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने शिकारे वस्ती व बाळगव्हाण ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यांच्या दुर्लक्षामुळे या बापलेकाचा बळी गेल्याचा कुटुंबीयांनी आरोप केला आहे.

YouTube video player

याबाबत महामंडळाच्या अधिकार्‍यावर चौकशी करून मृत्यूस असल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकरी यांनी केली आहे. या घटनेची माहिती समजली असता खर्डा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपास सुरू केला आहे.

ताज्या बातम्या

Accident News : राहुरी विद्यापीठाजवळील अपघातात जखमी महिलेचा मृत्यू

0
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri राहुरी कृषी विद्यापीठाजवळ नगर-मनमाड महामार्गावर 2 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या वेळी झालेल्या एका भीषण रस्ता अपघातात गंभीर जखमी झालेल्या 50 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान...