Friday, May 3, 2024
Homeनगरकुकाणा शिवारात वीज रोहित्र खाली पाडून 80 किलो अ‍ॅल्युमिनिअम कॉईलची चोरी

कुकाणा शिवारात वीज रोहित्र खाली पाडून 80 किलो अ‍ॅल्युमिनिअम कॉईलची चोरी

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यातील (Newasa Taluka) कुकाणा (Kukana) शिवारात वीज वितरण कंपनीचे (Power Distribution Company) रोहित्र (Rohitra) खाली पाडून त्यातील अ‍ॅल्युमिनियम कॉईल (Aluminum Coil) व ऑईल (Oil) अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली असून याबाबत महावितरणच्या (MSEDCL) लाईनमनने (Lineman) दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत ब्राह्मण म्हरू पवार (वय 52) धंदा- नोकरी लाईनमन रा. देवसडे ता. नेवासा यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, कुकाणा ते देवगाव जाणार्‍या रोडलगत कुकाणा शिवारात 30 मार्च सकाळी 9 वाजण्याच्या पूर्वी कुकाणा ते देवगाव रोडवर (Kukana-Devgav Road) कुकाणा शिवारात वीज वितरण कंपनीच्या (Power Distribution Company) विजेच्या खांबावरील रोहित्र खाली पाडून कोणीतरी अज्ञात चोरट्याने रोहित्रातील 24 हजार 400 रुपये किंमतीची 80 किलो वजनाची अ‍ॅल्युमिनीयम कॉईल व ऑईल स्वतःच्या फायद्यासाठी चोरुन नेले.

या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी (Newasa Police) अज्ञात चोरट्यावर गुन्हा रजिस्टर नंंबर 271/2022 भारतीय दंड विधान कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस नाईक बी. आर. कोळपे करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या