Tuesday, June 25, 2024
Homeधुळेआंबे येथील आगीत नुकसानग्रस्तांना तातडीची मदत

आंबे येथील आगीत नुकसानग्रस्तांना तातडीची मदत

शिरपूर : Shirpur

- Advertisement -

तालुक्यातील आंबे येथील तीन घरांना आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने माजी मंत्री अमरिशभाई पटेल व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा व उद्योगपती चिंतनभाई अमरिशभाई पटेल यांनी तातडीने आंबे येथील नुकसान ग्रस्तांची भेट देऊन पाहणी केली व त्यांना तातडीने सहा महिन्यांचे संसारोपयोगी किराणा रेशन, रोख रकमेचे चे वाटप केले.

यावेळी आमदार काशिराम पावरा, उद्योगपती चिंतनभाई पटेल, आंबे येथील वि. का. सोसायटी चेअरमन रमेश माळी, सामाजिक कार्यकर्ते हिरालाल देशमुख, स्वीय सहाय्यक अशोक कलाल, स्वीय सहाय्यक सुनील जैन, धिरज देशमुख, तलाठी कोकणी, सचिन माळी, अनेक पदाधिकारी, ग्रामस्थ, नुकसानग्रस्त भागातील अनेक महिला, पुरुष उपस्थित होते.

आंबे येथे दि. २६ ऑक्टोबर सोमवार रोजी पहाटे ५ वाजता एका घरात स्वयंपाक करताना गॅस सिलिंडरचा भडका उडाला. यावेळी आगीच्या भक्ष्यस्थानी संपूर्ण घर सापडले. घरातील सर्व महिला, पुरुष, लहान मुलांना घराच्या बाहेर खूपच जलद गतीने काढण्यात आले.

सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही, परंतु एकाच परिवारातील तीन घरांचे मोठे नुकसान झाले. यात सुकराम दौलत भिल, आत्माराम सुकराम भिल, भास्कर सुकराम भिल यांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर शेजारी तुळशीराम गणा भिल यांच्या घराला देखील आस पोहोचल्याचे सांगण्यात आले.

घटनेची खबर मिळाल्यावर लगेचच माजी मंत्री अमरिशभाई पटेल व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा व उद्योगपती चिंतनभाई अमरिशभाई पटेल यांनी घटनास्थळी धाव घेऊन संबंधित लोकांची भेट घेतली व त्यांना धीर दिला.

यावेळी एकाच कुटुंबातील या सर्वांना सहा महिने पुरेल एवढे अन्नधान्य, संपूर्ण किराणा राशन, रोख स्वरूपात मदत केली. शासनाच्या वतीने देखील मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे यावेळी आमदार काशिराम पावरा व चिंतनभाई पटेल यांनी सांगितले. यावेळी प्रशासनाला तशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या