मुंबई | Mumbai
मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबई विमानतळावर स्पाईस जेट कंपनीच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. यावेळी विमानाचे चाक निखळल्याचे समोर आले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, विमान क्रमांक SG2906चे चाक हवेतच निखळले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, ७५ प्रवाशी असलेल्या स्पाइसजेट क्यू ४०० या विमानाने गुजरातच्या कांडला विमानतळावरून उड्डाण घेतले होते. मात्र त्याचे एक चाक तेथील विमानतळावर निखळले. मात्र यानंतरही मुंबई विमानतळावर विमानाचे सुरक्षितपणे लँडिंग करण्यात यश आले आहे, त्यामुळे सुटकेचा निश्वास सोडला गेला. या दुर्घटनेमध्ये कुणालाही दुखापत झाली नाही. सर्व प्रवाशांना सुखरूपपणे खाली उतरवण्यात आलं आहे.
स्पाईस जेट विमानाकडून याबद्दल स्पष्टीकरण देण्यात आले आहे. १२ सप्टेंबरला कांडला विमानतळावरून या विमानाने मुंबईकडे येण्यासाठी टेकऑफ केले होते. पण, टेकऑफ केल्यांनंतर चाकामध्ये बिघाड झाला होता. पण, मुंबईत विमानतळावर सुखरूपपणे लँडिंग केले आहे. सगळे प्रवासी सुखरूप आहे, अशी माहिती स्पाईस जेटने दिली आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




