Friday, May 3, 2024
Homeनगरमुक्ताई ग्रुपच्या माध्यमातून महिलांना रोजगाराची संधी : आमदार पवार

मुक्ताई ग्रुपच्या माध्यमातून महिलांना रोजगाराची संधी : आमदार पवार

कर्जत (तालुका प्रतिनिधी) –

कर्जत- जामखेड एकात्मिक विकास संस्था व मुक्ताई ग्रुपच्या माध्यमातून राशीन येथे महिलांना रोजगार निर्मिती व्हावी या उदेशातून

- Advertisement -

मुक्ताई टेक्सटाईल या फर्मची उभारणी करण्यात आली असून त्याचे उद्घाटन आ. रोहित पवार यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी आ. रोहित पवार म्हणाले, कर्जत-जामखेडमध्ये विविध योजना सुरू करायच्या आहेत. येथील युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा या दृष्टिकोनातून येथे एमआयडीसी उभारण्यात येणार आहे. अनेक छोटे-मोठे व्यवसाय मुक्ताई ग्रुप सारख्या कंपन्यांशी संलग्नित होऊन या भागांमध्ये सुरू करायचे आहेत. शेतकर्‍यांचा प्रमुख असणारा प्रश्न म्हणजे कुकडीचा तो लवकरच मार्गी लागणार आहे. प्रत्येक चारीवर गेट बसविण्यात आलेले आहे. त्यानुसार पाण्याचे व्यवस्थित नियोजन केले जाणार आहे. त्याचप्रमाणे येथील महिलांना रोजगार निर्मिती व्हावी. या उद्देशातून एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून याठिकाणी बचत गटाची उभारणी करून महिलांना रोजगार दिला जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून याठिकाणी महिलांना रोजगार निर्मितीसाठी मुक्ताई टेक्स्टाईलचे पार्टनर बनविण्यात आलेले असून आज या महिला स्वबळावर प्रपंच चालवू शकतात.

कर्जत जामखेडमधील 200 बचत गटांना प्राधान्य द्यावे, अशी विनंती यावेळी सुनंदाताई पवार यांच्याकडे केली. करोनाच्या संकटामुळे अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत मात्र या महिलांनी एकत्र येत लक्ष्मी बचत गटाच्या माध्यमातून मुक्ताई टेक्स्टाईल हे फर्म सुरू केलेले आहे. एक महिन्यामध्ये त्यांना एक लाखाचा फायदा झाला. त्याचा चेक यावेळी आ. रोहित पवार व सुनंदाताई पवार, मुक्ताई ग्रुपचे संचालक सचिन चौरे यांच्याहस्ते वाटप करण्यात आला.

बारामती अ‍ॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदाताई पवार यावेळी म्हणाल्या कर्जत जामखेडमध्ये बचत गटाची संकल्पना फक्त बचती पुरतीच मर्यादित होती. मात्र मुक्ताई ग्रुपच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या या टेक्सस्टाईलमुळे महिलांना रोजगारही उपलब्ध झाला आहे. यावेळी श्याम कानगुडे, शाहूराजे राजेभोसले, माधुरी लोंढे, अशोक जंजीरे, राम कानगुडे, बबन जंजीरे, मालोजी भिताडे, बापू धोंडे, मुक्ताई ग्रुपचे सचिन चौरे, गायकवाड आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या