Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजईनाडू आणि रामोजी फिल्मसिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं निधन

ईनाडू आणि रामोजी फिल्मसिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं निधन

नवी दिल्ली | New Delhi

ईनाडू आणि रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव (Ramoji Rao) यांचे आज शनिवार (दि. ८ जून) रोजी पहाटे ३.४५ वाजेच्या सुमारास वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रामोजी राव यांच्यावर हैदराबाद येथील स्टार रुग्णालयात (Star Hospital) उपचार सुरू होते. त्यानंतर आज पहाटे राव यांनी अखेरचा श्वास घेतला.

- Advertisement -

रामोजी राव यांचा १६ नोव्हेंबर १९३६ या दिवशी आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) कृष्णा जिल्ह्यातील पेडापरुपुडी गावातल्या एका शेतकरी कुटुंबात जन्म झाला. रामोजी राव यांनी रामोजी फिल्म सिटी या जगातील सर्वात मोठ्या थीम पार्क आणि फिल्म स्टुडिओची स्थापना केली. मार्गदर्शी चिट फंड, ईनाडू न्यूजपेपर, ईटीव्ही नेटवर्क, रमादेवी पब्लिक स्कूल, प्रिया फूड्स, कालांजली, उषाकिरण मूव्हीज, मयुरी फिल्म डिस्ट्रिब्युटर्स आणि डॉल्फिन ग्रुप ऑफ हॉटेल्स या रामोजी राव यांच्या मालकीच्या कंपन्या आहेत.

दरम्यान, रामोजी राव यांचं पार्थिव हे त्यांच्या रामोजी फिल्म सिटी येथील निवासस्थानी नेण्यात येणार आहे. त्या ठिकाणी ते अंत्यदर्शनसाठी ठेवण्यात येईल. यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार (Funeral) करण्यात येणार आहेत. रामोजी राव यांच्या निधनानंतर सर्व स्तरातून शोक आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.

मोदींकडून शोक व्यक्त

रामोजी राव यांच्या निधनानंतर नरेंद्र मोदींनी एक्स (ट्वीट) या सोशल मीडिया अकाऊंटवरून शोक व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, “मी स्वतःला भाग्यवान समजतो की रामोजी राव यांच्याशी चर्चा करण्याची संधी मला मिळाली. त्यांच्या निधनाचे वृत्त क्लेशदायक आहे. त्यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो, सहवेदना या आशयाची पोस्ट नरेंद्र मोदींनी केली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Accident : आयशर-कारच्या अपघातात पती-पत्नी ठार; मुलगी गंभीर जखमी

0
ओझे | विलास ढाकणे | Oze दिंडोरी-वणी रस्त्यावरील (Dindori-Vani Road) वलखेड फाट्यावर झालेल्या आयशर व कार यांच्यात झालेल्या अपघातामध्ये (Accident) पती-पत्नी जागीच ठार (Killed)...