Monday, September 16, 2024
Homeदेश विदेशJammu Kashmir : अनंतनागनंतर आता बारामुल्लामध्येही चकमक, एका दहशतवाद्याचा खात्मा... सर्च ऑपरेशन...

Jammu Kashmir : अनंतनागनंतर आता बारामुल्लामध्येही चकमक, एका दहशतवाद्याचा खात्मा… सर्च ऑपरेशन सुरूच

दिल्ली | Delhi

- Advertisement -

अनंतनागमधील चकमकीदरम्यान, बारामुल्ला जिल्ह्यातील उरी, हातलंगा या फॉरवर्ड भागात देखील दहशतवादी आणि लष्कर आणि बारामुल्ला पोलिसांमध्ये चकमक सुरू झाली आहे. या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला असून पोलीस आणि सुरक्षा दलांकडून इतर दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जम्मू-काश्मीर पोलिसांनी यासंबंधीची माहिती दिली आहे.

दरम्यान हे दहशतवादी (Terrorists) सीमेपलीकडून आले आहेत की, आधीपासून येथेच राहत होते, याची स्पष्टता अजून झाली नाहीये. ही चकमक जेथे सुरु आहे तिथे घनदाट जंगल असून यात पाण्याचे नाले आणि काही बेवारस घरे आहेत. लष्कर अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरात काही दहशतवाद्याचा एक गट लपून बसल्याची माहिती पोलिसांना काल रात्री मिळाली होती. दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर जम्मू-काश्मीर पोलीस आणि लष्कर दलानं संयुक्त कारवाई करत त्या परिसरात नाकेबंदी केली.

आज सुरक्षा दल हे जेव्हा दहशतवाद्यांच्या ठिकाणाकडे पोहोचत होते त्यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यानंतर सुरक्षा रक्षकांडून उत्तर देण्यात आलं. दरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर रायफल ग्रेनेड आणि युबीजीएलनं हल्ला केला. दरम्यान, दहशतवाद्यांच्या संख्येविषयी लष्कर अधिकाऱ्यांनी अजून कोणताच स्पष्ट आकडा सांगितला नाहीये.

- Advertisment -

ताज्या बातम्या