Sunday, September 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजकाश्मीरमध्ये सुरक्षा दलाची मोठी कारवाई! लष्कर-ए-तोयबाचा पाकिस्तानी कमांडर यासिर ठार

काश्मीरमध्ये सुरक्षा दलाची मोठी कारवाई! लष्कर-ए-तोयबाचा पाकिस्तानी कमांडर यासिर ठार

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. बडगाम जिल्ह्यातील युसमर्गच्या उंचावरील अशदार गली परिसरात झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबा (LeT) या दहशतवादी संघटनेचा पाकिस्तानी कमांडर यासिर ठार झाला आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी त्याची ओळख पाकिस्तानी नागरिक आणि लष्कर-ए-तोयबाशी संबंधित दहशतवादी म्हणून केली आहे. ही कारवाई ‘ऑपरेशन अशदार’ अंतर्गत करण्यात आली.

- Advertisement -

‘ऑपरेशन अशदार’मध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई
विशिष्ट गुप्तचर माहितीच्या आधारे भारतीय लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफ यांनी अशदार गली परिसरात संयुक्त शोधमोहीम सुरू केली होती. परिसरात संशयास्पद हालचाली आढळल्यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना आव्हान दिले. त्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला आणि सुरक्षा दलांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. त्यात यासिर मारला गेला. सुलेमान उर्फ मुसा हा पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार होता. गेल्या वर्षी श्रीनगरमधील डाचीगाम जंगलात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत सुलेमानचा खात्मा करण्यात आला होता.

४५० वर्षांचा भौगोलिक भ्रम संपणार? आफ्रिका दिसणार मोठा; भारतासह १६४ देशांचा नकाशा बदलाला पाठिंबा

कोण होता यासिर
सुरुवातीला चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्याची ओळख पटलेली नव्हती. मात्र, तपासानंतर जम्मू-काश्मीर पोलिसांनी त्याची ओळख यासिर या पाकिस्तानी नागरिकाच्या रूपात केली. तो लष्कर-ए-तोयबाचा कमांडर असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी सोशल मीडिया पोस्टद्वारेही त्याच्या ओळखीची पुष्टी केली आहे. यासिरचा खात्मा हा सुरक्षा दलांसाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे, कारण तो जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय असल्याची माहिती समोर आली आहे.

अजून दहशतवादी लपल्याचा संशय
चकमकीनंतर सुरक्षा दलांनी परिसरात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू ठेवली आहे. आणखी एक ते दोन दहशतवादी जंगल परिसरात लपून बसल्याचा सुरक्षा दलांना संशय आहे. त्यामुळे अशदार गली आणि आसपासच्या घनदाट जंगलांमध्ये कॉम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. युसमर्ग परिसर हा उंच पर्वतीय आणि घनदाट जंगलांनी व्यापलेला असल्याने शोधमोहीम आव्हानात्मक ठरत आहे. सुरक्षा दलांकडून परिसरातील प्रत्येक भागाची बारकाईने तपासणी केली जात आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : सातपूरला जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ४९ जण...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik शहरातील सातपूर परिसरातील (Satpur Area) बजरंग नगर येथे सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर (Gambling Den) शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनच्या पथकाने...